पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/169

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

व वर सांगितलेली खुली जागा यांचा सभोवार तट आहे. परंतु तो ज्या ठिकाणी किल्ला बांधला आहे, त्याच्यापेक्षा सखल प्रदेशावर आहे. २ मंगळवेढयाचा किल्लाः-हा किल्ला बहुधा बेदरच्या बादशाहांनी बांधला असावा. पूर्वी मंगळवेढ्यास जैन लोकांची फार उत्तम भव्य देवालये होती, ती पाडून मुसलमानांनी त्याच सामानाने हा किल्ला बांधला असावा असें अनुमान होते. कारण, किल्लयांत विश्वनाथाचे देवालय आहे त्याच्या खांबावर अंगिरसनाम संवत्सरे शके १४९४ (इ. स. १५७२) भाद्रपद शुक्ल ३ अशी मित्ती दिली असून असे लिहिले आहे की, 'हिवरगीचा कुळकर्णी व मंगळवेढयाचा मुजूमदार याने तुल्ला याकुबखान याच्या परवानगीने किल्लयांतील जगभावी बुरूजाजवळच्या एका जुन्या पाडून टाकलेल्या देवालयाचा जणिोद्वार केला, व त्यांत विश्वनाथाच्या लिंगाची स्थापना केली.' किल्ल्याची उत्तरबाजू १२४५ फूट, पूर्वबाजू १२०० फूट, दक्षिणबाजू ११०० फूट व पश्चिमबाजू ९२० फूट लांब आहे. त्याचा तट ३५ फूट उंच व १२ फूट रुंद आहे, फक्त पूर्वबाजूचा तट पाडलेला आहे. बाकी सर्व किल्ला फार चांगल्या स्थितीत आहे. तटाला मदान, कराड, चोफाळा, जगभावी, गच्ची, कैकाड, आणि वोराळे असें सात बुरूज आहेत. यांत मदान बुरूज सर्वांत मोठा आहे. त्याची उंची ४७३ फूट व व्यास ५० फूट आहे. बाकीच्या सहा बुरूजांपैकी ६ वाटोळे आहेत, व चोफाळा बुरूज काटकोनाकृति आहे. सर्व बुरुजांची उंची एकसारखी नाही. किल्लयाच्या सभोवताल.