पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/168

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१६०). १६६७ त विजापुरच्या बादशाहानें हिसार किंवा किल्ला दोदवाड येथील दिवाणास त्या किल्लयाचे संबंधाने सालीना अमुक एक रकम खर्च करावी असा हुकूम . पाठविल्याचे आढळून येते. त्यावरून तो किल्ला त्या वर्षाच्या पूर्वी केव्हां तरी बांधलेला असावा असे उधड दिसते. विजापूर सरकारच्या मागून दोदवाड किल्लयाचे स्वामित्व सावनू. रच्या नबाबांकडे गेले. पुढे इ. स. १७९६ त वाळाजी वाजीराव ऊर्फ नानासाहेब पेशवे याने सावनूरच्या नबाबापासून जे २२ परगणे घेतले, त्यांत दोदवाडचें नांव आहे. या परगण्यांपैकी काही परगणे पुढे गोपाळराव गोविंद पटवर्धन याच्या मध्यस्थीमुळे सावनूरच्या नबाबास परत मिळाले. गोपाळरावाने अशा प्रकारे उत्कृष्ट कामगिरी बजाविल्यामुळे सावनूरचा नबाब अबदुल हकीमखान याने इ. स.१७६९ त दोदवाड गांव पहिले माधवराव पेशवे यांच्या मंजुरीने त्यास इनाम दिला. इ. स. १७९२ त टिपू सुलतान याने दोदवाडचा किल्ला व गांव घेऊन एक वर्षभर आपले राज्यांत सामील केला. इ. स. १७९३ त पेशव्याचे फौजेनें तो परत घेऊन पटवर्धनांस दिला. इ. स. १८०१ त पटवर्धनांच्या दौलतीचा विभाग झाला त्यावेळी दोदवाडप्रांत सांगली संस्थानचे मालक चिंतामणराव पटवर्धन यांचे अमलाखाली आला. दोदवाडचे सालीना उत्पन्न १८२७५ रुपये आहे. हल्ली तेथें म्युनिसिपालिटी आहे, व तिचें सालीना उत्पन्न ८०० रुपयांचे आहे. किल्लयाचे बाहेर ईशान्य बाजूस वहिवाटदाराची कचेरी आहे. दक्षिण बाजूस पुष्कळ खुली जागा आहे. तेथे पूर्वी बाग होता असे सांगतात. वहिवाटदाराची कचेरी