पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/167

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१५९) क्षिणेस तुंगभद्रा नदीपर्यंत पसरला आहे. या संस्थानाचे क्षेत्रफळ १०८३ चौरस मैल आहे. त्याची लोकसंख्या सुमारे दोन लाख आहे, व वसूल सुमारे आठ नऊ लक्ष रुपये आहे. सांगली संस्थानाचे सहा पेटे केलेले आहेत. त्यांची नांवेंः--१ मिरजप्रांत, २ कुची, ३ मंगळवेढें, ४ तेरडळ, ५ शाहापूर, ६ शिरहट्टी.. या संस्थानांत बरेच किल्ले आहेत. परंतु ते सर्व भुईकोट आहेत. त्यांचे वर्णन येणेप्रमाणः १ दोदवाडचा किल्लाः-हा किल्ला धारवाडच्या उत्तरेस १४ मैलांवर आहे. हा किल्ला पूर्वाभिमुख असून चतुष्कोण आहे. त्याचे काही बुरूज वाटोळे, कांहीं अर्धचंद्राकृति, व कांहीं चतुष्कोण आहेत. त्याची उत्तर बाजू ९७ फूट, पूर्वबाजू ७२७ फूट, दक्षिणबाजू ८५ फूट, व पश्चिम बाजू ६७२ फूट आहे. हा किल्ला एका खडकाळ टेकाडावर किंवा दरडीवर बांधलेला आहे. त्याच्या तटाची उंची साधारण २० फूट आहे. तटाचे निमे काम दगडी असून निमे विटांचे केलेले आहे. तटाला बंदुका मारण्याकरिता भोके पाडलेली आहेत. तटावर ४ फूट उंचीची पडभिंत आहे. किल्लयाच्या सभोवार खंदक असून त्याची रुंदी २५ फूट व खोली १२ पासून १९ फुटांपयेत आहे. हा किल्ला अद्यापि चांगल्या स्थितीत आहे. या किल्लयांत पूर्वी एक मोठा वाडा व एक मशीद अशा दोन इमारती होत्या असे सांगतात. परंतु हल्ली त्यांच्या कांहींच खाणाखुणा दृष्टीस पडत नाहीत. हा किल्ला कोणी कधी बांधिला ते कळत नाही. परंतु इ. स.