पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/166

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१५८) जले होते, त्या वेळी कोल्हापुरच्या सभोवार असलेला मातीचा कोट पाडून ३० फूट उंच व दहा पासून २० फुटांपर्यंत रुंद असा पावणे दोन मैल परिघाचा भक्कम दगडी कोट बांधला. या कोटाला समान अंतरावर ४५ बुरूज होते, व त्याच्या सभोंवार खोल व रुंद असा खंदक होता. तटाला एकंदर सहा दरवाजे होते, व त्यांपैकी तीन दुहेरी होते. दरवाज्यांची दारें भक्कम असून त्यांना बाहेरून लांब लांब चोंचीचे लोखंडी खिळे मारलेले होते. त्या दरवाज्यांची गंगा दरवाजा, रंकाळें दरवाजा, वरुणतीर्थ दरवाजा, आदित्यवार दरवाजा, मंगळवार दरवाजा व शनवार दरवाजा अशी नांवें होती. प्रत्येक दरवाज्याच्या तोंडाशी खंदकावर काढतां व घालतां येण्यासारखा पूल तयार केलेला होता. दरवाजे रात्रीस अकरा वाजतां लागत असत, व पहाटेस चार वाजतां उघडत असत. कोल्हापुरची लोकसंख्या वाढत चालली तसतसे लोक किल्ल्याच्या बाहेर वस्ती करूं लागले. अंशा रीतीने एकंदर दहा पेठा किल्लयाचे बाहेर वसल्या. कोल्हापुरची हवा पूर्वीपासून चांगलीशी नव्हती. ती सुधारण्याकरितां अलीकडे पूर्वीच्या किल्ल्याच्या भिंती पाडून टाकिल्या, व सभोवतालचा खंदक भरून काढिला. सांगली संस्थान सांगली संस्थानाखाली मोडणारा मुलूख तुटक तुटक असून तो उत्तरेस सातारा व सोलापूर ह्या जिल्ह्यांपासून द