पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/165

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१९७) पुनः नवीन किल्ला बांधला. त्याची पूर्वपश्चिम लांबी ३७७ फूट व उत्तरदक्षिण रुंदी ३६६ फूट आहे. किल्ल्याचा तट रुंद व मजबूत आहे. सभोवार खंदक आहे. हल्ली तट पुष्कळ ठिकाणी पडलेला आहे. इ. स. १८५८ त इंग्लिश सरकाराने या किल्लयाच्या तटाचा पूर्वेकडील भाग पाडून टाकिला. ( ३ ) कोल्हापूर येथील किल्लयाचे संबंधाने अशी दंतकथा आहे की, जैन लोक ब्रह्मपुरी टेकडीवर अंबाबाईचे देवालय बांधीत असतां जयसिंग नांवाच्या क्षत्रिय राजाने हा किल्ला बांधला. हा जयसिंग कोल्हापुरच्या पश्चिमेस सुमारे ९ मैलांवर बिड या शहरी राहत असे. बाराव्या शतकांत कलचुरी घराण्याने कल्लयाणचे चालुक्य राजांस जिंकून दक्षिणेचें आधिपत्य मिळविल्यावर ते व चालुक्यांचे मांडलिक कोल्हापुरचे शिलाहार राजे यांच्यामध्ये या किल्लयाचे संबंघाने पुष्कळ दिवस युद्ध चालले होते. पूर्वी कोल्हापूर हे एक साधारण खेडे होते. विजापुरच्या बादशाहांच्या अमलांत विजापुरचा कोणी तरी एक सरदार पन्हाळा किल्ल्याच्या संरक्षणाकरितां नेहमी कोल्हापूर येथें छावणी देऊन असे. इ. स. १६५९ त शिवाजीने कोल्हापूर घेतले. इ. स. १७३० त कोल्हापुरजें राज्य सातारच्या मुख्य गादीपासून विभक्त झाल्या. वर कोल्हापूर शहर फार भरभराटीस आले. इ. स. १७८२ त कोल्हापुरचे राजे पन्हाळा सोडून कोल्हापूर येथे आले. या पूर्वी चोरटे लोकांचा किंवा परशत्रूचा उपद्रव न व्हावा म्हणून कोल्हापुरच्या सभोवार एक मातीची भिंत मात्र होती. पुढे पटवर्धन व कोल्हापुरकर यांच्यामध्ये इ. स. १७७३ पासून १८१० पर्यंत जे तंटे मा---