पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/164

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सुरुंग लावून किल्लयाचा पश्चिमेकडील कोपरा उडविण्याचा प्रयत्न केला, त्याचप्रमाणे घोणसली नांवाच्या शेजारच्या डोंगराच्या माथ्यावरून किल्लयावर तोफांचा भडिमार चालविला. परंतु तो त्याचा सर्व प्रयत्न व्यर्थ गेला. विजापुरच्या सैन्यान पाण्याकरितां शेजारच्या गजापूर नांवाच्या खेड्यांत खोदलेल्या विहिरीच्या खुणा अद्यापि दृष्टीस पडतात, व ज्या ठिकाणी त्या सैन्याने तळ दिला होता, त्या जागेला अद्यापि 'बादशाहाचा माळ' असे म्हणतात. इ. स. १७३० त कोल्हापूर व सातारा ही दोन्ही राज्ये पृथक् झाली, तेव्हां कोल्हापुरच्या संभाजीने (इ. स. १७१२--१७६० ) जनार्दनपंत प्रतिनिधि यास विशाळगडची पुनः नवीन सनद करून दिली. इ. स. १८४४ पर्यंत प्रतिनिधि विशाळगड येथे राहून आपला सर्व कारभार पहात असत. परंतु त्या वर्षी गडकरी लोकांनी जे बंड केले त्यांत तो किल्ला बंडखोर लोकांचे हाती गेला. पुढे त्या बंडाचा मोड झाल्यावर इंग्लिश सरकाराने तो किल्ला पाडून टाकिला, व तेव्हापासून प्रतिनिधि मलका. पूर येथे राहूं लागले. । वर सांगितलेल्या डोंगरी किल्लयांशिवाय कोल्हापूर संस्थानाखाली मोडणारे तीन भुईकोट किल्ले होते. (१) गडइंग्लज-हा किल्ला कापशी संस्थानचे मालक घोरपडे यांनी इ० स० १७०० च्या सुमारास बांधला होता. हल्ली त्याची सर्वत्र पडापड झालेली आहे. (२) कागल येथे पूर्वी किल्ला होता. कोल्हापुरचा सरदार यशवंतराव शिंदे याने इ. स.१७८० च्या सुमारास तो पाडून टाकिला. नंतर इ. स. १८१३ त हिंदुराव घाटगे याने त्याच जागेवर