पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/163

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११५) बांधला याची तारीख पाहिजे असेल तर ती दौलत बुरूज याच अक्षरांत आहे.' M ES 'दौलत बुरूज' या फारशी अक्षरांतून ओढून ताणून ६४५ (इ. स. १२४७) असा अंक काढतां येतो, व याच वर्षाच्या सुमारास विशाळगड मुसलमानांचे हातून गेला. इ. स. १४५३ च्या सुमारास अल्लाउद्दीनखान बाहामणी (इ. स. १४३५-१४५७) याचा सेनापति मालिक-उल्-तुजार हा विशाळगडच्या रस्त्याने आपल्या सैन्यासह कूच करीत असतां शंकरराव मोरे नांवाच्या मराठे सरदाराने त्याच्यावर अकस्मात् छापा घालून त्याला कैद केलें, व त्याच्या सर्व सैन्याची कत्तल केली. इ. स. १४६९ त प्रख्यात बाहामणी सरदार महंमद गवान याने शंकररावाचा पराभव केला. त्याने विशाळगडास वेढा घातला, परंतु तो हाती येण्यास त्याला नऊ महिने झटापट करावी लागली. बाहामणी राज्य मोडल्यावर इ. स. १४८९ त या किल्ल्याचे स्वामित्व विजापुरच्या बादशाहांकडे गेले. तेव्हांपासून सुमारे पावणे दोनशे वर्षे तो विजापूर सरकारचे ताब्यात होता. इ. स. १६५९ त शिवाजीने विजापुरकरांपासून तो किल्ला घेतला, व इ. स. १६६० त त्याने त्याचा प्रतिनिधि परशुराम त्रिंबक यास तो इनाम दिला. तेव्हापासून आज तागायत तो त्याच्या वंशजांच्या ताब्यात आहे. इ. स. १६६१ त विजापुरचा सरदार फजलखान हा बरोबर मोठे सैन्य घेऊन आला, व त्याने विशाळगडास वेढा दिला. हा वेढा पुष्कळ महिने पडला होता. त्याने