पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/162

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हिंदुमुसलमान मिळून सुमारे तीन चारशे लोक जमतात. ह्या मशिदीला सरकारांतून सालीना ९० रुपयांची नेमणूक आहे. किल्ल्यांत भोपाळ व अर्धचंद्र अशी दोन पाण्याची तळी असून शिवाय एक टांके आहे. भोपाळ त लावाचे क्षेत्रफळ ६४०० फूट असून तो भोपाळ नांवाच्या - राजाने बांधला अशी दंतकथा सांगतात. अर्धचंद्र तलाव सतरा फूट लांब, पंधरा फूट रुंद व आठ फूट खोल आहे. इ. स. १६५९ त शिवाजीने हा किल्ला मुसलमानांपासून घेतल्यावर त्याची देखरेख रामचंद्रपंत अमात्य यास सांगितली. तेव्हां त्याने हा तलाव बांधला असे सांगतात. आंतील टांकेही ३२४ चौरस फूट असून दहा फूट खोल आहे, व तेही रामचंद्रपंतानेंच बांधले. या किल्लयाचे संबंधाने दंतकथेवरून अशी माहिती मिळते की, इ. स. १००० च्या सुमारास विशाळगड भोपाळ नांवाच्या एका हिंदु राजाच्या अमलाखाली होता. भोपाळ तलाव त्यानेच बांधला. आंतील मशिदीच्या भिंतीवर एक फारशी शिलालेख आहे, त्यांत असे लिहिले आहे की, " हा किल्ला भोज नांवाच्या एका हिंदु राजा. च्या ताब्यात होता. मी मालिक रहान याने सहा वेळ किल्लयास वेढा दिला परंतु तो माझे हाती आला नाही. नंतर सातव्याने मी किल्लयास वेढा दिला, व तो माझे हाती आला." तसेंच दौलत बुरुजावर आणखी एक शिलालेख आहे, त्याचा सारांश असा आहे की, 'दीर्घ प्रयत्नाने मोठमोठ्या संकटांतून पार पडतां येते' असा जगाचा नियम आहे. 'दौलत बुरुजाचे काम फारच उत्तम रीतीने पुरे केले आहे. ' ' जर तुम्हाला तो कधीं