पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/161

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१९३) हा किल्ला शिवाजीचे ताब्यात आला, तेव्हां त्याने त्याची उत्तम दुरुस्ती केली. शिवाजीच्या अमलांतील किल्लयांमध्ये हा जरी लहान किल्ला होता, तरी तो सर्वांत अतिशय बळकट होता. निजामाचे स्वारांनी या किल्ल्यास १२ वर्षे वेढा दिला होता, तसेंच पटवर्धन व निपाणीकर यांनी त्याला वेढा दिला होता, परंतु तो त्यांना घेतां आला नाही. कोल्हापुरचा दिवाण दाजी पंडित याने अविचाराने या किल्लयांतील गडकन्यांच्या पूर्वापार चालत आलेल्या इनाम जमिनी मामलेदाराच्या देखरेखीखाली दिल्या. तेव्हां त्या लोकांस मोठा राग येऊन त्यांनी इ. स. १८४४ त बंड केलें, व किल्लयाचे दरवाजे लावून घेतले. पुढे इंग्लिशांचा सरदार जनरल दिलामोटी याने ता.१३ आक्टोबर सन १८४४ रोजी तो किल्ला गडकरी लोकांचा पराभव करून घेतला, व पुढे त्या किल्लयाचा तट पाडून टाकिला. पूर्वी तेथे मामलेदाराचे ठाणे असे, परंतु इ. स. १८४४ त ते तेथून काढून गडइंग्लज येथे आणिलें. ७ विशाळगड. हा किल्ला कोल्हापुरच्या वायव्येस ४५ मैलांवर गजापूर नांवाच्या डोंगरावर बांधलेला आहे. याची लांबी ३२०० फूट व रुंदी १०४० फूट आहे. या किल्ल्याचा तट, त्याचे दरवाजे, व बुरूज यांची हल्ली बहुतेक पडापड झालेली आहे. किल्लयांत सुमारे पंधरावीस घरे आहेत. आंत कोल्हापुरच्या प्रतिनिधींचा जुना वाडा असून एक मशीद आहे. या मशिदीत १७ फूट लांब १५ फूट रुंद व आठ फूट उंच अशी हजरत मालिक रहान पीर नांवाच्या मनुष्याची कबर आहे. दर वर्षी जिल्हेज महिन्याच्या तेराव्या तारखेस तेथें उरूस भरतो, व त्याला