पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/160

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१५२) आहे. हल्ली आंत मुळीच वस्ती नाही आंत तीन विहिरी, व दोन लहान टांकी आहेत. हल्ली किल्लयाच्या उतरणीवर वरी, नाचणी, हरीक वगैरे धान्य पिकतें. इ० स०१६५९ त शिवाजीने हा किल्ला मुसलमानांपासून घेतला, व त्याची उत्तम दुरुस्ती केली. तेव्हांपासून मराठ्यांचे राज्य लयाला गेले तरी तो अद्यापि मराठ्यांच्या (कोल्हापूर सरकारच्या) ताब्यात आहे. शाहूमहाराज ब ताराबाई यांच्यांत गादीविषयी तंटा लागला तेव्हां ताराबाई रांगण्यास जाऊन राहिली होती. शाहूमहाराजांनी त्या किल्लयास वेढा दिला व तो घेण्याकरितां आपली पराकाष्ठा केली, परंतु त्या वेळी तो किल्ला त्यांचे हाती आला नाही ( इ० स० १७०९). इ० स० १८४४ त कोल्हापूर प्रांतांतील गडकरी लोकांनी बंड केले त्या वेळी ब्रिटिश सरकारच्या हुकुमावरून कोल्हापूर सरकाराने रांगण्याची तटबंदी पाडून टाकली. त्याला प्रसिद्धगड असेंही नांव आहे. तो पन्हाळ्याच्या शिलाहार राजांनी जे १५ किल्ले बांधले त्यांपैकी एक आहे अशी त्याची दंतकथा आहे. ६ सामानगड. हा किल्ला गडइंग्लजच्या दक्षिणेस साडेतीन मैलांवर एका एकीकडे झुकलेल्या दीर्घ वर्तुळाकति अशा डोंगराच्या फाट्यावर बांधलेला आहे. समुद्राच्या सपाटीपासून याची उंची २६०० फूट आहे, व रुंदी २६० फूट आहे. डोंगराच्या माथ्यासभोवार ८ फूट उंचीचा तट घातलेला आहे. किल्ल्यांत खडकांत खोदलेली पाण्याची पुष्कळ टांकी आहेत. पूर्वी या किल्ल्याच्या सरक्षणाकरितां ३५० शिपायी, १० तोफा, १०० बंदुका, व २०० तलवारी इतका सरंजाम असे. इ. स. १६७६ त