पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/159

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१९१) असतो. येथे पूर्वी पाराशर ऋषि राहत असत असे करवीरमाहात्म्य नामक ग्रंथांत वर्णन केले आहे. तसेच किल्लयाच्या दक्षिणेस खडकांत खोदलेली एक गुहा आहे, तिला पाराशर ऋषींची गुहा असे म्हणतात. ला गा४ पावनगड. हा किल्ला पन्हाळगडाच्या पूर्वेस सुमारे अर्ध्या मैलावर एका डोंगरावर बांधलेला आहे. पन्हाळगड व पावनगड यांच्यामध्ये एक मोठे खोरे आहे. या किल्ल्याच्या सभोवार पंधरा पासून वीस फुटांपर्यंत एकसारखा तुटलेला कडा असल्यामुळे त्याला विशेष बळकटी आलेली आहेव जेथे जेथें कड्याचा चढाव सोपा असे वाटले तेथें तेथें खडक फोडून तो अवघड केलेला आहे. किल्लयाच्या सभोवार १४ फूट उंचीचा काळ्या दगडांचा भक्कम तट घातलेला आहे. किल्ल्याला पूर्वी दोन दरवाजे होते, ते इ० स० १७४४ त इंग्लिश सरकाराने पाडून टाकिले, व किल्ल्याचा तटही फोडून टाकला. हल्ली हा किल्ला ओसाड आहे. परंतु आंतील पाणी फार चांगले आहे. ५ रांगणा किल्ला. हा किल्ला सह्याद्रीच्या एका सपाट माथ्याच्या फांटयावर बांधलेला आहे. याची उंची २६०० फूट आहे. हा किल्ला भूधरगडाच्या नैर्ऋत्येस ३० मैलांवर, व कोल्हापुरच्या नैर्ऋत्येस १५ मैलांवर आहे. ह्या डोंगराची तीन बाजूंची चढण फार अवघड आहे. फक्त उत्तरेकडील चढाव सोपा आहे. किल्लयाचा तट बिनटांकीच्या दगडांचा परंतु चुन्याने बांधलेला आहे. किल्लयांतून खाली उतरण्यास तीन पायवाटा आहेत. किल्लयांतील प्रदेश. उंचसखल आहे. त्याची पूर्वपश्चिम लांबी ४७५० फूट, व दक्षिणोत्तर रुंदी २२४० फूट