पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(८) तला, व तो ३८ गांवांचे सुभ्याचे ठिकाण केले. उत्तरठाणे प्रांतांत पोर्तुगीज लोकांची जी ठाणी होती, त्या सर्वांचे अशिरगड हे नाके होते. त्याने पोर्तुगीज लोकांच्या मुलुखाच्या ईशान्येस चंधार लोक, पूर्वेस कोळी लोक व आग्नेयीस अहमदनगर सरकार यांची तोंडे जणुकाय दाबून धरिली होती. पूर्वी ह्या डोंगराच्या पायथ्याशी वरणीपूर म्हणून एक कोळी लोकांची वसहत होती. पुढे ते ठिकाण पोर्तुगीज लोकाचे हाती आल्यावर त्यांनी तेथें मेढेकोट बांधून वर तीन तोफा ठेविल्या. किल्ल्याची चढण इतकी बिकट होती की, वर जावयाचे म्हणजे एक अनवाणी, किंवा दोऱ्या धरून वर जावे लागत असे. मार्गात किल्लयाजवळ जाऊन पाहाँचेपर्यंत एकंदर १३ खिंडी लागत असत. किल्यावर जाण्याचे मार्गाचे तोंडाशी जी खिंड होती, तिला सलद खिंड असे म्हणत, व तेथें मेढेकोट बांधलेला असून कोळी लोकांचा पहारा होता. येथून पुढे गेलें म्हणजे एक अरुंद व तुटलेली अशी बारीतून पाउलवाट होती. ही वाट इतकी भयंकर होती की, एक पाऊल घसरले तर चढणारा खाली भयंकर कड्यांत पडून त्याचे तुकडे तुकडेच व्हावयाचे. ह्या बारीच्या माथ्याशी एक गुहा लागत असे, तीतून वर गेलें म्हणजे किल्ल्याचा पहिला दरवाजा लागे. ह्या दरवाज्याला लागूनच एक ७० पायांचा दगडी जिना होता व तो चढून वर गेले म्हणजे किल्याचा दुसरा दरवाजा होता. हा दरवाजा अतिशय मजबूत असून तेथे पोर्तुगीज लोकांची चार कुटुं त्याच्या संरक्षणाकरितां ठेवलेली होती. ह्या दरवाज्याच्या आंत दुसरा एक तटबंदी केलेला दरवाजा होता व त्यावर