पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मध्यम रीतीच्या इमारती होत्या, व दोन पाण्याचे हौद होते. तसेंच आंत १९ तळघरे होती. इ० स ० १८६२ त किल्ल्याची बहुतेक पटापड झालेली होती. हा किल्ला इ. स. १७८० त जनरल गोदर्द साहेबाच्या लष्करापैकी लेफटेनेंट वेल्श ह्याने काबीज केला. किल्लयांतील तळघर प्राचीन काळची आहेत असे म्हणतात, परंतु त्यांतून शिलालेख वगैरे काही नाही. ह्या किल्ल्याचे संबंधानें महत्वाची अशी ऐतिहासिक गोष्ट घडून आल्याचे दिसत नाही.. ८ सेगवाह किल्ला---हा किल्ला डहाणूच्या पूर्वेस १६ मैलांवर एका टेकडीवर बांग्लेला होता. आता त्याचा मागमूसही राहिलेला नाही असे म्हटले तरी चालेल. इ. स. १८१८ त या किल्ल्याच्या दक्षिण टोंकाची तटबंदी कायती शिलक होती. बाकीच्या तटाची थोडथोडी पडापड झालेली होती. या किल्ल्याचे खालचा व वरचा असे दोन भाग होते. इ. स. १८१७ त खालचे किल्ल्याचा दरवाजा जाळून टाकण्यांत आ. त्या वेळी आंत सुमारे १० पाण्याची टांकी होती. माहीम तालुका. sloween ९ अशिरीचा किल्ला. हा किल्ला माहीमच्या ईशान्येस २२ मैलांवर अशिरी नांवाच्या डोंगरावर बांधलेला आहे. हा किल्ला भोज नांवाच्या राजाने बांधला व तो १४ शतकाच्या प्रारंभी माहीमचा राजा बिंब याने कोळी किंवा नाईक लोकांपासून घेतला. इ० स० १५५६ त हा किल्ला पातुगीज लोकांनी घे...