पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दोन तोफा ठेवलेल्या होत्या. किल्ल्याच्या माथ्यावर गुरे, मेंढरें, बकरी, डुकरें यांना चरावयास मुबलक जागा होती. तेथून सभोवतालच्या सर्व प्रांताचा समुद्रापर्यंतचा देखावा दिसत असे. माथ्याला तटबंदी वगैरे केलेली नव्हती, परंतु डोंगराच्या कडेवर कदाचित् कोणी शत्रु वर येण्याचा प्रयत्न करूं लागला तर त्याचा नाश करण्याकरितां मोठमोठ्या दगडांच्या राशी घालून ठेवलेल्या होत्या. वर २० पाण्याची टांकी, व दोन पाण्याचे खजिने होते. आंत बायका पोरें धरून एकंदर सातशे मनुष्ये होती, व हीच किल्ल्याची शिंबदी होय. पोर्तुगीज लोक या किल्ल्याला विशेष महत्त्व देत असत. प्रत्येक दरवाज्यावर पोर्तुगीज पहारेकरी ठेविलेले होते, व किल्लेदाराचे परवानगीशिवाय कोणास आंत येध्याची अगर बाहेर जाण्याची सक्त मनाई होती. अस्तमानी सर्व दरवाज्यांस कुलुपें पडत, व पहारेकरी सर्व किल्लया किल्लेदाराजवळ आणून देत, व सूर्योदयीं तो त्या त्यांच्याकडे परत पाठवी. किल्ल्यांतील शिबंदी नेहमीं सावध असे. रात्रीस ५० धनुर्धारी पोर्तुगीज लोकांचा पहारा असे, व ते उजेडाकरितां मोठमोठ्या चुडी पेटवीत असत. इ. स. १६१३ त पोर्तुगीज लोकांनी आपल्या पुष्कळ किल्ल्यांवरची शिबंदी कमी केली, परंतु अशिरगडावरील शिबंदी कमी केली नाही. इ. स. १६६० च्या सुमारास हा किल्ला मोगलांनी घेतला. परंतु इ. स. १६८३ त पोर्तुगीज लोकांनी तेथें मोंगलांचा एक हबशी सरदार होता त्याला ६५०० रुपये लांच देऊन तो परत घेतला. इ. स. १७३७ च्या सुमारास चिमणाजी आप्पाने माहीम