पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/158

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१५०) 'गंगा कोठी' असे म्हणतात. तिला दोन दारे आहेत. परंतु ती हल्ली गाळ साचल्यामुळे गच्च भरून गेली आहेत. या कोठीच्या दोन्ही बाजूंस दोन दगडी जिने आहेत, व तिच्या माथ्यावर धान्य ओतण्याकरितां भोके ठेविलेली आहेत. याशिवाय 'धर्मकोठी' म्हणून एक कोठी हल्लींच्या मामलेदार कचेरीच्या शेजारी आहे. किल्लयाच्या पूर्वेस तटाला लागून ' कलावंतिणीचा सज्जा' म्हणून एक जागा आहे. ह्या इमारतीच्या सुंदर नक्षीदार कडीपाटाचा फारच थोडा भाग हल्ली अवशेष राहिला आहे. ही इमारत ६० फूट लांब, ३५ फूट रुंद, व ५८ फूट उंच आहे. किल्लयाचे उत्तर भागांत हल्लीच्या कोल्हापुरच्या महाराजांचा राजवाडा आहे. हा वाडा दुमजली आहे, व ह्यांत सुमारे २०० मनुष्ये राहण्यासारखी जागा आहे. ह्या राजवाड्याच्या पूर्वेस तटाशेजारी 'सज्जेकोठी' म्हणून एक दुमजली दगडी इमारत आहे. किल्लयाचे दक्षिण भागांत तटाशेजारी तालीमखान्याची जागा आहे. ह्या इमारतीला घुमटाच्या तीन खोल्या आहेत. येथे पूर्वी तालीम करीत असत. मामलेदार कचेरीच्या दक्षिणेस 'रेडे महाल' म्हणून १०१ फूट लांब, ५३ फूट रुंद, व ३६ फूट उंच अशी एक इमारत आहे. मामलेदार कचेरीला लागूनच संभाजी महाराज (इ. स. १७१२-१७६० ) यांचें देवालय आहे. या देवालयाच्या समोर संभाजी महाराजांच्या राणी साहेब जिजाबाई यांचे देवालय आहे. मुसलमानी अमलांतील इमारतीपैकी मुख्य इमारत म्हटली झणजे साधोबा नांवाच्या मुसलमान साधूचा मठ ही होय. हिच्या सभोंवार दगडी भिंत आहे. दरवर्षी येथे उरूस भरत