पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/157

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

फूट रुंद व २७ फूट खोल आहे. ह्या दोन्ही तळ्यांना खाली उतरण्यास दगडी पायऱ्या बांधलेल्या आहेत. किल्लयांतील मुख्य विहिरीस शृंगारबाव किंवा अंधारबाव असें ह्मणतात. ही किल्लयाच्या पश्चिमेकडील तटाला लागून आहे. दर आदित्यवारी या किल्ल्यांत बाजार भरतो. त्या दिवशी सुमारे बाहेरचे १००० मनुष्य येते, व सुमारे ५०० रुपयांची विक्री होते. किल्ल्याच्या पायथ्याशी ज्या वाड्या आहेत तेथें दर गुरुवारी बाजार भरतो. पन्हाळा येथे मामलेदार कचेरी, फौजदार कचेरी, व सबरजिस्ट्रार कचेरी अशा तीन सरकारी कचेया असून शिवाय एक मराठी शाळा व तिचीच एक पोटशाळा अशा दोन शाळा आहेत. युरोपियन लोकांस उतरण्याकरितां एक बंगला आहे, व हिंदु वाटसरू मंडळीस उतरण्याकरितां तीन चार देवालये आहेत. जुने रस्ते पूर्वी अरुंद होते ते हल्ली रुंद केलेले आहेत, व दर वर्षास सरकारी खर्चाने त्यांची दुरुस्ती होत असते. जो किल्लयांत पडापड झालेल्या जुन्या इमारती बऱ्याच आहेत. सर्वात जुनें काम म्हटले ह्मणजे बालेकिल्ला होय. हा किल्ल्याच्या मध्यभागी असून त्याच्या सभोवार उंच तट आहे. परंतु ह्या तटाची हल्ली पडापड झालेली आहे. बालेकिल्लयांत फणसाची, आंब्याची, पेरूची वगैरे पुष्कळ झाडें आहेत. आंत पूर्वी एक राजवाडा होता, परंतु हल्ली त्याचा फक्त चौथरा मात्र दृष्टीस पडतो, व झाडझुडपांत गडप होऊन गेलेली कांहीं खांबांची उथळी दृष्टीस पडतात. याशिवाय या किल्लयांत फक्त दगड व चुना यांनी बांधलेल्या जुन्या तीन कोठ्या आहेत; सर्वांत मोठया कोठीला