पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/156

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

इंग्लिशांनी दिलामोटी नांवाच्या साहेबाच्या हाताखाली कांहीं फौज देऊन त्यास बंडवाल्यांवर पाठवून दिले. त्याने इ. स. १८४४ च्या दिजंबर महिन्याच्या पहिल्या तारखेस तटाला खिंडार पाडून आंतील लोकांवर हल्ला करून पन्हाळगड घेतला, व त्याची तटबंदी पाडून टाकिली. त्या वेळी इंग्लिशांनी १८४६ लष्करी लोक व शंभर तोफा इतका सरंजाम किल्ल्याच्या संरक्षणाकरितां तेथें ठेविला होता. - हल्ली पन्हाळा हे पन्हाळा तालुक्याचे मुख्य ठिकाण असून कोल्हापूर संस्थानापैकी उत्कृष्ट हवेचे एक ठिकाण आहे. पन्हाळ्याचे दोन भाग आहेत; एकाला किल्ला पन्हाळा किंवा 'हुजूर बाजार' असे म्हणतात. हा टेकडीच्या अगदीं माथ्यावर आहे. दुसऱ्या भागांत किल्ल्यांतील रविवार, मंगळवार, गुरुवार, आणि इभ्रमपूर या पेठा मोडतात. दोन्ही भाग मिळून सुमारे २५०० लोकांची वस्ती आहे. टेकडीच्या माथ्यावर कोठे खोल तुटलेले कडे, कोठे तळी, कोठे वृक्षछायेखाली असलेले पाण्याचे झरे इत्यादि गोष्टींचा देखावा फारच रमणीय दिसतो. पावसाळा शिवाय करून बाकीच्या ऋतुकाली तेथील हवा फारच उत्तम असते. आजपर्यंत पन्हाळा येथे पटकीचा उपद्रव झालेला ऐकिवात नाही; याचे मुख्य कारण तेथील पाणी फारच उत्तम व पाचक आहे. तेथील सर्वात उत्कृष्ट झऱ्याला नागझरी असे म्हणतात. साधोबा व सोमाल या दोन तळ्यांतील पाण्याचा किल्लयांतील लोकांस पुरवठा आहे. पहिले तळे २२१ फूट लांब, १४८ फूट रुंद व ३५ फूट खोल आहे, व दुसरे तळे २२० फूट लांब, १९०