पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/154

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लांचे ताब्यात गेला. पुढे इ. स. १६९२ त विशाळगडच्या पंतप्रतिनिधि घराण्याचा मूळ पुरुष परशुराम त्रिंबक याने तो किल्ला मोंगलांपासून परत जिंकून घेतला. इ. स. १७०१ त औरंगजेब बादशाहाने जातीने या किल्ल्यास वेढा देऊन तो मराठ्यांपासून घेतला. ता० २८ एप्रिल १७०१ रोजी इंग्लिशांचा वकील सर वुइलियम नॉरिस हा पन्हाळा किल्ल्यावर औरंगजेबाच्या भेटीस गेला, व त्याने त्यास २००मोहरा नजर करून आपणांस-इंग्लिशलोकांसत्याचे राज्यांत व्यापाराच्या सवलती मिळाव्या म्हणून त्याच्याशी बोलणे लाविलें. परंतु त्या वेळी बादशाहाने त्याचे बोलणे मान्य केले नाही. औरंगजेब पन्हाळा सोडून गेला नाहीं तोंच हल्लीच्या बावडेकर घराण्याचा मूळपुरुष रामचंद्रपत याने त्याच वर्षी (इ. स. १७०१) तो परत जिंकून घेतला. इ. स. १७०५ त राजारामाची स्त्री प्रसिद्ध ताराबाई हिने पन्हाळा येथे आपली गादी स्थापिली, व तेथें राहून ती आपला सर्व कारभार पाहूं लागली. इ० स० १७०८ त संभाजीचा पुत्र शाहू व ताराबाई यांच्यांत गादीविषयीं तंटा सुरू झाला, व इ० स० १७०९ त शाहूनें ताराबाईवर स्वारी करून पन्हाळा किल्ला घेतला, तेव्हां ताराबाई मालवणास पळून गेली. नंतर वाडीचा फोड सावंत याच्या मदतीने ती पुनः कोकणांतून निघून पन्हाळ्यास आली, व त्याच वर्षों तिनें तो किल्ला पुनः हस्तगत केला. तेव्हापासून आजपर्यंत तो किल्ला कोल्हापूर सरकारच्या अमलाखाली आहे. कोल्हापुरच्या राणीसाहेब जिजाबाई यांच्या कारकीर्दीत पन्हाळा येथें नरमेध करीत असत. हा नरमेध राणी