पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/153

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शिवाजीने मोठ्या युक्तीने आपली तेथून सुटका केली, व तो कोल्हापुरच्या नैर्ऋत्येस पंचावन मैलांवर रांगणा किल्लयावर निघून गेला. या कामी शिवाजीचा शूर सरदार बाजी देशपांडया याने स्वामीसेवेकरितां आपले प्राण खर्ची घातले. नंतर अल्ली अदिलशाहा स्वतः येऊन त्याने पन्हाळा, व पावनगड हे दोन्ही किल्ले सर केले. इ. स. १६७३ त शिवाजीने विजापुरकरांपासून तो किल्ला परत जिंकून घेतला. इ. स. १६७४ त विजापुरच्या बादशाहाचा सरदार अबदुल करीम याने पन्हाळा घेण्याकरितां आपली शिकस्त केली, परंतु किल्ला त्याचे हाती लागला नाही, व शिवाजीचे मृत्यूपर्यंत तो मराठ्यांचे ताब्यात होता. शिवाजीने मरणाचेपूर्वी काही दिवस आपला पुत्र संभाजी यास त्याच्या वाईट वर्तणुकीबद्दल पन्हाळा किल्ल्यावर कैदेत ठेविले होते. शिवाजी रायगड येथें मृत्यु पावल्यावर त्याची धाकटी बायको सोयराबाई हिने दरबारी मंडळीच्या साहाय्याने संभाजीचा गादीवरचा हक्क उडवून टाकून तिचा पुत्र राजाराम याचे नांवाने राज्यकारभार पाहण्यास सुरवात केली. संभाजीस ही बातमी कळतांच त्याने किल्ल्यावरील शिबंदीस वश करून घेऊन आपली सुटका केली. पुढे त्यास हंबीरराव मोहिते सेनापति हाही येऊन मिळाला. नंतर तो ताबडतोब रायगडास आला, व राजारामाचे पक्षाचे मंडळीचा विध्वस करून आपण गादीवर बसला. पुढे ९ वर्षांनी ह्मणजे इ. स. १६८९ त औरंगजेबाचा सरदार तकरीबखान याने संभाजीस कोकणांत संगमेश्वर येथे कैद केले. त्या वेळी पन्हाळा किल्ला मोंग १३