पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/152

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१४४) उत्तरेस वलवड येथे राहत असे. त्यालाच हल्ली वलिवडे असें म्हणतात, व ते कोल्हापुरच्या उत्तरेस ४॥ मैलांवर आहे. भोजराजाने एकंदर पंधरा किल्ले बांधिले, व त्यांत बावडा, भूधरगड, पन्हाळा, सातारा आणि विशाळगड हे मुख्य होते. इ० स० १२०९-१० च्या सुमारास देवगिरीच्या यादवांनी भोजराजाचा पराभव केल्यामुळे त्याच्या हातून पन्हाळा किल्ला गेला. पुढे तो किल्ला कांहीं दिवस पुडपाळेगार लोकांच्या ताब्यांत होता असे दिसतें. इ० स० १३९६ त किल्लयाचे आग्नेयीस नभापूर नांवाचे शहर स्थापन झाले असा शिलालेख सांपडतो. इ० स० १४८९ त तो किल्ला विजापुरच्या अदिलशाही घराण्याचे ताब्यात गेला. त्या वेळी तेथील बादशाहाने त्याची उत्तम रीतीनें दुरस्ती केली. किल्ल्याचे भक्कम तट व दरवाजे याच घराण्यांतील पुरुषांनी बांधले, व त्यांचे बांधकाम बरोबर शंभर वर्षे चालले होते, अशी दंतकथा आहे. इब्राहिम अदिलशाहा किंवा पहिला इब्राहिम इ० स० १५३४-६७ याच्या कारकीर्दीत खोदलेले पुष्कळ शिलालेख या किल्लयांत आहेत. इ० स० १६५९ त शिवाजीनें विजापुरचा सरदार अफजूलखान यास ठार मारल्यानंतर लौकरच पन्हाळा किल्ला विजापूरकरांपासून जिंकून घेतला. तेव्हां विजापुरसरकाराने शिदीजोहार यास पन्हाळा शिवाजीपासून परत जिंकून घेण्याकरितां पाठवून दिले. शि. द्दीने ताबडतोब किल्लयास वेढा दिला. त्या वेळी शिवाजी या किल्लयांतच होता. किल्लयास सुमारे चार महिने वेढा पडला होता. ह्या वेढयाचे काम शिदीजोहार याने मोठ्या नेटाने चालविले होते. शेवटी निरुपाय होऊन