पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/151

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१४३) उंची सुमारे ३०४७ फूट आहे, व कोल्हापुरच्या बाजूने याची उंची सुमारे ९७५ फूट आहे. या किल्ल्याचा घेर ४॥ मैल आहे. सुमारें निमे भागाला ३० पासून ५० फूट खोल तुटलेला कडा आहे, व त्याला मधूनमधून तट बांघलेला आहे. बाकीच्या निमे भागाला १५ पासून ३७ फूट रुंदीचा भक्कम व उंच दगडी तट घातलेला आहे, व इकडून तिकडे तोफा वगैरे नेण्याआणण्याकरितां मधून मधून बुरूज बांधलेले आहेत. किल्ल्याला तीन दुहेरी भक्कम दरवाजे होते. वर जाण्याला दगडी पायऱ्या बांधलेल्या आहेत. किल्ल्याच्या तीन दरवाज्यांपैकी वाघ दरवाजा, व चोर दरवाजा हे कोसळून पडले आहेत, व तिसरा दरवाजा मात्र अद्यापि शाबूत आहे. हा दरवाजा भक्कम असून त्याच्यावर नक्षीचे सुंदर काम केलेले आहे. ह्या दरवाज्यापासून सुमारे ४६ यार्डीवर तटाला एक भगदाड दृष्टीस पडते, तेथून इ. स. १८४४ त इंग्लिश फौजेने मोठ्या नेटाने किल्ल्यांत शिरून तो बंडखोर लोकांपासून घेतला. किल्ल्याच्या उत्तरेस ९० यार्ड रुंदीचा एक स्वतःसिद्ध तलाव आहे. किल्ल्यांत जिवंत पाण्याच्या दोन विहिरी असून दुसरे पुष्कळ झरे आहेत. या पन्हाळा येथें प्राचीन काळी पराशर ऋषि रहात असत अशी दंतकथा सांगतात. करवीर पुराणामध्ये पन्हाळ्याचे पन्नगालय असें नांव आढळते. जुन्या शिलालेखांत त्याचें पद्यनाल असें नांव लिहिलेले आहे. साताऱ्यास एक ताम्रपट सांपडला त्यांत इ० स० ११९१-९२ त पन्हाळा हे शिलाहार राजा दुसरा भोज याच्या राजधानीचें शहर होते असे लिहिले आहे.हा राजात्या पूर्वी कोल्हापुरच्या