पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/150

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१४२) जीने त्या किल्लयाची नीट दुरस्ती केली, व त्याच्यावर शिबंदी वगैरे ठेवून त्याचा उत्तम बंदोबस्त केला. पुढे काही वर्षांनी तो मोंगलांनी जिंकून घेतला; परंतु सुमारे ५ वर्षांनी मरठ्यांनी किल्लयावर हल्ला करून मोंगलांचा पराभव केला, त्यांच्या सरदारास ठार मारिलें, व मोंगलांची निशाणे बहिरवनाथास देऊन टाकिली. ती निशाणे अद्यापि तेथे आहेत. अखेरीस हा किल्ला परशुराम भाऊ पटवर्धन याने किल्लयांतील शिबंदी वश करून घेऊन आपले ताब्यात घेतला; परंतु पुढे दहा वर्षांनी कोल्हापुरच्या राजाने तो परत जिंकून घेतला. पुढे परशुराम भाऊ व इचलकरंजीचा मुख्य गोपाळपंत या दोघांनी मिळून तो किल्ला परत घेण्याविषयी पुष्कळ प्रयत्न केला, परंतु तो सर्व व्यर्थ गेला. इ. स. १८४४ त सामानगड व भूधरगड येथील शिंबदीने बंड करून किल्ल्यांचे दरबाजे बंद केले. पुढे तारीख १३ अक्टोबर १८४४ रोजी जनरल डिलामोटी याच्या हाताखालच्या इंग्लिश फौजेनें तो घेतला, व पाडून टाकिला. ह्या किल्ल्यांत हल्ली एक सुंदर राजवाडा, एक धान्याची मोठी कोठी, व पांचहजार रुपये खचुन एक पाण्याचा हौद बांधलेला आहे. ह्या किल्ल्यांतील बहिरवाचे देवालय पाहण्यासारखे आहे. त्या देवालयाकडे सालीना ५६० रुपयांची नेमणूक असून शिवाय १३० रुपये धाऱ्याची जमीन आहे. येथे दरवर्षी माघ कृष्ण १ पासून १० पर्यंत मोठी यात्रा भरत असते. ३ पन्हाळा किल्लाः—हा किल्ला सह्याद्रीच्या एका शिखरावर बांधलेला असून तो कोल्हापुरच्या वायव्येस सुमारे दहा मैलांवर आहे. समुद्राचे पृष्ठभागापासून याची