पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/149

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सैन्याचा एका प्रसंगी, पराभव करून टाकला. पुढे तेंबंड लौकरच मोडलें. इ० स० १८०० त भगवंतराव पंतअमात्य याने बावडा किल्ल्याची नीट दुरस्ती केली, व पेशव्यांचा एक सरदार तो किल्ला घेण्याकरितां आला होता त्याचा पराभव करून त्यास ठार मारिलें. इ० स० १८४४ त सामानगड व बावडा येथील शिबंदीनें बंड केले. परंतु सामानगडावरील शिबंदीचा पराभव होऊन तो किल्ला हाती येतांच बावडा किल्लाही इंग्लिशांचे हाती आला, व त्या वेळी त्यांनी किल्ल्याची कांही तटबंदी पाडून टाकिली. हा किल्ला अद्यापि साधारण बऱ्या स्थितीत आहे. किल्ल्याचे पायथ्याशी बावडा नांवाचे एक लहानसें खेडे आहे. येथें इ० स० १८४८ पासून कोल्हापुरच्या काळ्या पायदळ पलटणीची एक टोळी असते. २ भूधरगड. हा किल्ला कोल्हापुरच्या दक्षिणेस ३६ मैलांवर एका खडकाळ डोंगरावर बांधलेला आहे. त्याची उत्तरदाक्षिण लांबी २६०० फूट व पूर्वपश्चिम रुंदी २१०० फूट आहे. या किल्ल्याला दोन दरवाजे आहेत व त्याच्या तटाची हल्ली बरीच पडापड झालेली आहे. किल्लयांत सुमारे ३३ घरे असून त्यांत सुमारे ९७० लोकांची वस्ती आहे. डोंगराचे पायथ्याशी दोन लहान वाड्या असून त्यांपैकी एकीत दर सोमवारी लहानसा बाजार भरत असतो. इ० स० १.६७ च्या पूर्वी भूधरगड याची विशेष प्रसिद्धि त्यावर केदारलिंग, बहिरवनाथ वगैरे जी पवित्र देवस्थाने आहेत, त्यांबद्दल होती, व त्या देवतांचे पुजारी डोंगराचे पायथ्याशी एक खेडे होते तेथे राहत असत. इ० स० १६६७ त शिवा