पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वर व्याहाळी नांवाच्या खेड्यांत मोडतो. ज्या टेकडीवर हा किल्ला बांधलेला आहे, तिची उंची २२७० फूट असून तिचा माथा फार अरुंद आहे. परंतु तिचा पायथा मात्र बरेच मैल पसरलेला आहे. ज्या ज्या ठिकाणी टेकडीची चढण सोपी होती त्या त्या ठिकाणी तटबंदी केलेली आहे. परंतु हल्ली तिची पडापड झालेली आहे. इ. स. १८१८ मध्ये टेंकडीच्या एका बाजूस फक्त १२० फूट लांबीचे एक भिंताड अवशेष होतें, व मध्ये एक बांबूचा दरवाजा होता; या दरवाज्याला लागून किल्लयांतील शिबंदीच्या झोपड्या होत्या. टेकडीच्या माथ्यावर एक टांके आहे, व तेथून किल्लयांतील लोकांस पाण्याचा पुरवठा होत असे. हल्ली या किल्लयाची पडापड झालेली आहे. ७ इंद्रगड.--हा किल्ला उंबरगांवच्या उत्तरेस १६ मैलांवर समुद्रकिनाऱ्यापासून दोन मैलांवर काळू नांवाच्या नदीच्या दक्षिण तीरावर एका दोनतीनशे फूट उंचीच्या वृक्षाच्छादित टेकडीवर बांधलेला आहे. ह्या किल्ल्याच्या पूर्व व पश्चिम या बाजू नीट सरळ आहेत. किल्ल्यापासून ४०० याडौंवर एक टेकडी आहे तिच्यावरून या किल्ल्यावर मारा लागू पडतो. हा किल्ला फार लहान म्हणजे १८० फूट लांब व १२० फूट रुंद आहे. इ. स. १८१८त या किल्ल्याचे तटाला वाटोळे बुरूज असून त्यांची उंची २० फूट व जाडी सुमारे १० फूट होती. किल्ल्याचा तट दुरुस्त होता, परंतु तटावरील भिंत नादुरुस्त होती. तिची जाडी सुमारे १० फूट होती. आंत जाण्यास दोन दरवाजे होते, व त्यांच्या रक्षणाकरितां त्यांना लागूनच बांध. लेल्या भिंती फारच मजबूत होत्या. किलयांत दोन