पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/148

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१४०) शिवाजीने पन्हाळा, विशालगड व रांगणा हे किल्ले घेतले, त्याच वेळी हा किल्लाही विजापुरचा बादशाहा दुसरा अल्ली अदिलशाहा (इ. स. १६५६--१६७२) याजपासून घेतला व तो निको सोनदेव पिंगळे यास जहागिरी दाखल दिला. विजापुरच्या बादशाहानें तो शिवाजीपासून पुनः परत घेतला. परंतु शिवाजीनें तो किल्ला पुनः जिंकून घेतला. इ० स० १६८९ त मोंगलांनी शिवाजीचा पुत्र संभाजी यास रत्नागिरी जिल्ह्यांत संगमेश्वर येथें कैद केले, त्या वेळी बावडा मोंगलांचे हातांत गेला. राजारामाचे कारकीर्दीत बावडेकरांचा मूळ पुरुष रामचंद्र निळकंठ यानें तो मोंगलांपासून जिंकून घेतला. त्या कामगिरीबद्दल राजारामानें तो किल्ला रामचंद्रपंतास बक्षिस दिला. पुढे सातारा व कोल्हापूर या दोन राज्यांत तंटा लागला (इ. स. १७०८--इ. स. १७२९) त्या वेळी रामचंद्रपंत कोल्हापुरच्या संभाजीचा पक्ष धरून राहिला. त्यामुळे संभाजीने रामचंद्रपंत वारल्यावर बावड्याची जहागीर रामचंद्रपंताचा पुत्र भगवंतराव याजकडे पुढे चालविली. त्या वेळी बावडेकरांच्या ताब्यात रत्नागिरी जिल्ह्यांत मालवण व विजयदुर्ग एथपर्यंतचा मुलूख होता. तसेच त्यांच्या पदरी घोडेस्वार व पायदळ मिळून एकंदर २६००० फौज असे, त्यामुळे त्यांनी शाहूमहाराजांच्या मुलखाला फार त्रास देत असत. इ०स० १७८२ त कोल्हापुरच्या राजांनी बावडा येथून आपली राजधानी काढून कोल्हापुरास नेली. त्या वेळी बावडा येथील गडकरी लोकांचे पुष्कळ हक्क काढून घेतले, त्यामुळे त्या लोकांनी बंड केलें, व कोल्हापुरच्या