पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/147

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( १३९) ९१३१३१ आहे, व त्याचा वसूल सुमारे ३०८८३४० रुपये आहे. ह्या संस्थानाचे एकंदर १० विभाग किंवा पेटे केलेले आहेत ते येणेप्रमाणः-१करवीर. २ पन्हाळा. ३ आळते ४ शिरोळ. ५ गडइंग्रज. ६ भूधरगड. ७ विशाळगड ८ बावडा. ९ कागल. १० इचलकरंजी. यांपैकी विशाळगड, बावडा, कागल व इचलकरंजी ही कोल्हापूर संस्थानापैकी पोटसंस्थाने असून त्यांचा कारभार तेथील संस्थानिक स्वतंत्र रीतीने पहात आहेत. कोल्हापूर संस्थानाच्या उत्तरेस वारणा नदी-ईच्यापलीकडे सातारा जिल्हा लागतो; पूर्वेस कृष्णा व दुधगंगा ह्या नद्या, सांगली व मिरज ही संस्थाने, व बेळगांव जिल्ह्यापैकी चिकोडी तालुका; दक्षिणेस बेळगांव जिल्हा; व पश्चिमेस सह्याद्रीची ओळ,-हिच्या पलीकडे रत्नागिरी जिल्हा व सावंतवाडी संस्थान ही आहेत. याची उत्तरदक्षिण लांबी सुमारे ६५ मैल, व पूर्वपश्चिम रुंदी ८ पासून ६० मैलपर्यंत आहे. ह्या संस्थानांतील किल्ले येणेप्रमाणे: १ बावडाकिल्ला---पन्हाळ्याच्या भोजराजाने (इ० स० ११७८-१२०९ ) जे पंधरा किल्ले वांधिले, त्यांपैकी हा एक होय. हा किल्ला कोल्हापुरच्या वायव्येस ३६ मैलांवर सह्याद्रीच्या एका शिखरावर बांधलेला आहे. समुद्राचे सपाटीपासून याची उंची सुमारे २५०० फूट आहे. कोकणाच्या बाजूने हा किल्ला उंच व तुटलेला दिसतो, व त्यावर जाण्याचा मार्गही फार बिकट आहे. पूर्वी या किल्लयाचे सभोवार अतिशय दाट जंगल होते. परंतु हल्ली ती झाडी पुष्कळ कमी झाली आहे. इ० स० १६६० त