पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/146

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

((१३८) ला किंवा बालेकिल्ला लागतो. बालेकिल्ल्याचा तट स्वतःसिद्ध उंच दरडीवर बांधलेला आहे. त्याच्या दरवाज्याच्या दोन बाजूस दोन सुंदर व मजबूत बुरूज बांधलेले आहेत; हलों तेथें पोस्ट आफीस आहे. आंत एका आवारांत कांही इमारती आहेत. पूर्वी येथे शिकारखाना होताः म्हणजे त्या इमारतीत रानटी हिंस्र पशु ठेवीत असत. हल्ली त्या इमारतीत पोलिटिकल सुपरिटेंडंट व त्याचे मदतनीस यांच्या कचेऱ्या आहेत. या इमारताना लागूनच एक चतुष्कोनी दोन मजली वाडा आहे. त्याची पूर्वेकडील बाजू एकमजली आहे व कोणा थोर गृहस्थाची मुलाखत घेणे, त्यास पानसुपारी करणे वगैरे गोष्टी या दालनांत कर तात. बाकीच्या भागांत कमाविसदार, दफतरदार, रजिष्टर, न्यायाधीश, खजीनदार वगैरे अधिकाऱ्यांच्या कचेऱ्या आहेत. याच इमारतीला दर्शनी नवीन भाग बांधलेला आहे व घड्याळाकरितां एक मनोरा बांधलेला आहे. या इमारतीपासून जवळच सरकारी तुरुंग, अश्वशाळा, व राजवाडा या इमारती आहेत. कोल्हापूर संस्थानांतील किल्ले. मा -:*:कोल्हापूर हे संस्थान उत्तर अक्षांस १७° १० ४५. व १५०५० २०" आणि पूर्व रेखांश ७४° १४११" व ७३° ४३ १६" यांचेमध्ये आहे. याच्या पूर्वेस रायबाग व आग्नेयीस कटकोल हे भाग ह्यांत धरून या संस्थानाचें क्षेत्रफळ २८१६ चौरस मैल आहे, त्याची लोकसंख्या