पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/145

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

((१३७) केलेल्या होत्या. परंतु त्या तशा पूर्वी होत्या, अशाबद्दलची हल्ली कांहींच खूण दृष्टोत्पत्तीस येत नाही. हल्ली या किल्ल्यावर जातां येत नाही. या किल्लयासंबंधाने फारशी माहिती उपलब्ध नाही. परंतु इ. स. १८४४ त मनोहरगडावरील गडकरी लोकांनी बंड केले, त्या वेळी तो त्यांच्या ताब्यांत असावा, व जनरल डिलामोटी याने मनोहरगड काबीज केला त्याच वेळी हा किल्लाही त्याच्या हाती आला असावा. ___७ सांवतवाडीचा किल्लाः-सांवतवाडी येथे मोती तलाव नांवाचा एक मोठा तलाव आहे, व त्याचे क्षेत्रफळ सुमारे ३१ एकर आहे. या तलावाच्या पूर्वेकडील बाजूस वाडीचा किल्ला बांधलेला आहे. त्याचे बांधकाम चिखलांत दगड बसवून केलेले आहे, व हल्ली तो मोडकळीस आलेला आहे. त्याच्या आग्नेयी व दक्षिण या दिशांस खंदक आहे. उन्हाळ्यांत हा खंदक कोरडा असतो. त्याचा आकार वांकडातिकडा असून त्याची लांबी ३१० यार्ड व रुंदी १५० यार्ड आहे. त्याचे बुरूज आच्छादित असून त्याला बंदुका मारण्यकरितां भोके ठेविलेली आहेत. किल्लयांत जाण्याला तीन वाटा आहेत. मुख्य दरवाजा उत्तरेच्या बाजूस आहे व त्याच्या दोन बाजूस दोन बुरूज आहेत. तथापि हा दरवाजा फारसा भक्कम नाही. किल्लयांत दोन पितळेच्या व बाकीच्या लोखंडी मिळून बऱ्याच जुन्या तोफा आहेत, परंतु त्या निरुपयोगी आहेत. वर सांगितलेल्या तलावाच्या काठावर एक दरवाजा आहे. त्याला मस दरवाजा असें म्हणतात. याच्याही दोन बाजूंस दोन बुरूज आहेत. या दरवाज्यांतून आंत गेले झणजे आंत