पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/144

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१३६) मनोहरगडावरील लोकांनी दोन महिनेपर्यंत इंग्लिशांस दाद दिली नाही. नंतर कपतान पोफम साहेब बरोबर मोठी फौज घेऊन मनोहरगडावर चाल करून गेला. बंडखोरांचे मुख्य ठाणे तारगोळ नांवाच्या टेकडीवर होते; तेव्हां पोफम साहेबाने आपला मोर्चा प्रथमतः तिकडेच फिरविला. या ठिकाणी इंग्लिशांची व बंडवाल्यांची फारच निकराची लढाई होऊन तांत शेवटी बंडवाल्यांचा पराभव झाला. ह्या अपजयानंतर काही दिवसांनी बंडवाल्यांनी मनोहरगडही सोडून दिला, व तारीख २७ जानेवारी इ. स. १८४५ रोजी जनरल डिलामोटी यानें तो किल्ला आपले ताब्यात घेतला. पुढे ह्या बंडाचा शेवट झाल्यावर इंग्लिशांनी हा किल्ला व त्याचे उत्पन्न सर्व वाडीकरांस दिले. गडकरी लोकांकडे पूर्वापार ज्या जमिनी चालू होत्या, त्या त्यांच्याशी त्या वेळी काही विशेष करार करून कायम ठेविल्या, त्यांची पूर्वीची नक्त वेतनें बंद केली, व जे गडकरी मूळ वाडी प्रांतांत राहणारे असून कोल्हापूर प्रांतांत येऊन राहिले होते, त्यांनी वाडी प्रांतांत परत न येतां घांटावरच रहावे, असा कायमचा ठराव क रून टाकिला हल्ली हा किल्ला ओसाड अशा स्थितीत आहे. ६ मनसंतोषगडः-हा किल्ला मनोहरगडापासून सुगरे २०० यार्ड अंतरावर आहे. या दोन किल्ल्यांच्यामध्यं फक्त एक मोठे खोरे आहे. या किल्ल्याचे क्षेत्रफळ सुमारे १५ एकर आहे, व त्याचा आकार फार चमत्कारिक आहे; ह्मणजे सर्व बाजूंनी त्याला कोन आलेले आहेत. त्याची उंचीही मनोरगडाइतकीच आहे. पूर्वी या किल्ल्यावर जाण्याला त्याच्या माथ्याशी खडक फोडून पायऱ्या तयार