पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/143

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१३९) तील धान्याची लूट केली. तारीख ११ रोजी किल्ल्यांतील २०० गडकरी हत्यारबंद होऊन बाहेर पडले, व त्यांनी दुकानवाडी येथील सरकारी लष्करावर हल्ला केला. परंतु त्या लोकांनी बंडखोरांस पिटाळून लाविलें. तारीख १३ रोजी मेजर बेनबो हा सातव्या पायदळ पलटणीचे काही लोक बरोबर घेऊन वेंगुर्लाहून तांदुळवाडी येथील लष्कराच्या मदतीकरतां आला. इकडे मनोहर गडावरील शिबंदीने रांगणा किल्ल्यावरील लोकांस वश करून घेतलें, त्यामुळे बंडवाल्यांस बराच जोर आला, व त्या लोकांनी पुनः दुकानवाडी येथील इंग्लिशांच्या फौजेवर चाल केली. या वेळी इंग्लिशांचे लष्कर थोडे असल्यामुळे त्यांची अगदी पांचांवर धारण बसली होती. बंडखोरांचा समुदाय मोठा असल्यामुळे वाडीप्रांतांत जे लष्कर होते, तेवढें त्यांचा मोड करण्यास पुरेसे नव्हते. तेव्हां कोल्हापुरचा त्या वेळचा पोलिटिकल एजंट सर जेम्स औटरम यास त्या लोकांच्या मदतीस जाण्याचा हुकूम झाला. नंतर औटरम साहेब आपल्या लष्कराच्या चार टोळ्या बरोबर घेऊन वाडीप्रांतांत येण्याकरितां निघाला. त्याने वाटेने ठिकठिकाणी बंडखोरांचा पराभव करून त्यांचा जोर मोडला. या बंडांत आपल्या आठ पुत्रांसह वाडीचा फोड सावंत व कोल्हापुरचे अण्णासाहेब भोंसले हेही सामील होते; त्यामुळे बंडवाले फारच चढून गेले होते, व त्यांनी आसपासच्या मुलखास बराच त्रास दिला. परंतु औटरम याने सपाट प्रदेशांतून त्यांचा पराभव करून त्यांस घालवून दिल्यामुळे ते लोक फक्त डोंगरी किल्ल्यांचा आश्रय धरून बसले होते.