पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/142

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

खालचा कोकणपट्टीचा देखावा फारच मनोहर दिसतो; व हवा स्वच्छ असली तर जरी तेथून समुद्र तीस मैलांवर आहे तरी तो स्पष्टपणे दिसतो. या किल्लयाची उंची सुमारे २५०० फूट आहे व त्याचे क्षेत्रफळ सुमारे २० एकर आहे. ५ मनोहरगडः—हा किल्ला वाडीच्या ईशान्येस १४ मैलांवर रांगणा किंवा प्रसिद्धगड किल्ल्याच्या दक्षिणेस एका डोंगराच्या २५०० फूट उंचीच्या एका शिखरावर बांधलेला आहे. तो पांडवांनी बांधला, अशी त्याच्या संबंधाची दंतकथा सांगतात. तो हुशार शिबंदीच्या हाती असेल तर शत्रु कितीही बलाढ्य असला तरी त्याला वर चढाव करून जाणे फार बिकट जाईल. त्याचा आकार तिकोनी असून त्याची लांबी ४४० यार्ड व रुंदी ३५० यार्ड आहे. किल्ल्यावर जाण्याला पायथ्यापासून माथ्यापर्यंत खडकांत खोदलेल्या एकसारख्या पायऱ्या आहेत, व जेथें या पायऱ्या संपतात, तेथे दोन भक्कम दरवाजे आहेत. वर जाण्याला एवढीच कायती वाट आहे. इ० स० १८४४ त कोल्हापूर प्रातांतील गडकरी लोकांनी जो दंगा केला, त्या वेळी या किल्ल्यावरील चार पांचशे गडकरी बंडवाल्यांत सामील झाले. वाडी व कोल्हापूर या दोन प्रांतांतील बंडखोर लोकांचा एकमेकांशी मिलाफ होऊ नये, अशाबद्दल इंग्लिश सरकाराने पुष्कळ प्रयत्न केला. परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. मनोहर किल्लयावरील गडकरी लोकांनी तारीख १० आक्टोबर रोजी रात्रौ गोठुस येथील सबनिसाच्या वाड्यावर दरवडा घालून त्याचे सरकारी व खासगी कागदपत्र जाळून टाकिले, त्याचा खजिना लुटून नेला, व बाजारपेठे