पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/141

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१३३) कट नाही. पश्चिमेच्या अंगास एक चोर दरवाजा आहे. त्याची हल्ली पडापड झालेली आहे. आंत कांहीं तोफा आहेत, परंतु त्या निरुपयोगी आहेत आंत एक जुनी मोडून पडलेली मशीद आहे. अद्यापि तिच्यांत एखादे वेळी मुसलमान लोक आपला नमाज पढतात. आंत एक विहीर आहे तिला घोडबाव असें म्हणतात. तिचा घेर १०० फूट असून खोली ४० फूट आहे. तिला पायऱ्या आहेत व त्यांवरून घोड्यावर बसून आंत पाण्यापर्यंत जाता येते. याच गोष्टीवरून तिला घोडबाव असें नांव पडले आहे. इ. स. १८७७ साली किल्लयांत एक इमारत बांधिली. तिच्यांत हल्ली सरकारी कचेऱ्या असून पोलीस लोकांचेही ठाणे आहे. ४ महादेवगडः-हा किल्ला सह्याद्रीच्या एकीकडे झुकलेल्या अशा एका फाट्यावर पारपोली घाटाच्या माथ्यावर आंबवली नांवाच्या गांवापासून सुमारे दीड मैलावर बांधलेला आहे. या किल्लयाचा तट फारसा बळकट नाही. इ. स. १८३०त लेफटेनंट कर्नल मारगन याने हा किल्ला सावंतांपासून घेतला. त्या वेळी या किल्ल्याला पूर्वेच्या बाजूस दोन दरवाजे होते, व त्यांच्या संरक्षणाकरितां तीन बुरूज बांधलेले होते. किल्लयावर जाण्याचा रस्ता बराच अवघड असून तो अरुंद होता. या किल्लयापासून तोफेच्या गोळ्याच्या अंतरावर दोन उंचवट्याच्या जागा आहेत, तेथून या किल्लयावर मारा लागू पडतो. इ. स. १८८० त या किल्लयाचा पूर्वेकडील भाग-दरवाजे, बुरूज वगैरे-जमीनदोस्त झालेला होता. हल्ली किल्लयांतील जमीनीत गुरे चरतात. या किल्लयावर उभे राहिले ह्यणजे १२