पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/140

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अतिशय मजबूत होता. परंतु त्याची बंदोबस्ती चांगली नव्हती. इ० सं० १८४५ त हा किल्ला पाडून टाकिला. २ बोदे येथील किल्ला: बांदे हा गांव तेरेखोलच्या खाडीच्या काठी वाडीच्या दक्षिणेस सहा मैलांवर व समुद्रकिनाऱ्यापासून सुमारे वीस मैलांवर आहे. तेरेखोलच्या खाडीच्या भरतीचे पाणी या गांवापर्यंत येते. हा गांव प्राचीन काळापासून फार प्रसिद्ध आहे. या गांवीं एक किल्ला आहे. तो खाडीच्या डाव्या अंगास सुमारे एका गोळीच्या टप्प्यावर एका ७२ फूट उंचीच्या टेकाडावर बांधलेला आहे. या किल्लयाचें कांहीं काम घडीव दगडांचे असून काही ठिकाणी ते अगदी साधे आहे. त्याची लांबी १०० फूट व रुंदी ५० फूट आहे. या किल्लयाला जे बुरूज आहेत ते आच्छदलेले आहेत. त्याचा दरवाजा आग्नेयी दिशेस आहे. पश्चिमेच्या बाजूस एक चोर दरवाजा आहे व तेथून खाली खाडीपर्यंत बांधीव पायऱ्या आहेत. हा किल्ला विशेष बळकट नाही. आंत कांहीं जुन्या निरुपयोगी तोफा आहेत. हल्ली किल्लयांत मामलेदार व महालकरी यांच्या कचेन्या आहेत. -३ कुडाळचा किल्ला:- कुडाळ हा प्रसिद्ध गांव वाडीच्या उत्तरेस १३ मैलांवर आहे. याच्या पश्चिमेच्या अंगास एका उंचवट्यावर एक किल्ला बांधलेला आहे. त्याचा तट दगड व चिखल यांनी बांधलेला आहे, व त्याला मध्यतरी बुरूज आहेत. तो विजापुरच्या बादशाहांनी बांधला असे सांगतात. त्याचे क्षेत्रफळ १६० चौरस यार्ड आहे. त्याच्या सभोवार खंदक आहे. किल्ल्याच्या आमेयीकडील कोपऱ्यांत तीन दरवाजे आहेत. परंतु त्यांचे बांधकाम फारसें बळ