पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/139

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१३१) सांवतवाडी संस्थान- - सावंतवाडी हे संस्थान उत्तर अक्षांश १६°१५३०" व १५° ३६' ५३" आणि पूर्व रेखांश ७४° २०११ व ७३° ३६ ११” यांच्यामध्ये आहे. या संस्थानाचे क्षेत्रफळ सुमारे ९२६ चौरस मैल आहे, लोकसंख्या १९२९४८ आहे व वसूल २८३११ रुपये आहे. याच्या उत्तरेस मालवण तालुका, ईशान्य व पूर्व या दिशांस कोल्हापूर संस्थान, व बेळगांव जिल्हा; यांच्या दरम्यान सह्या द्रीची ओळ आहे. दक्षिणेस पोतुगीज अमलांतील डिचोली व पेडणे हे परगणे आहेत, व पश्चिमेस रत्नागिरी जिल्ह्यांतील वेंगुर्ले व मालवण हे तालुके आहेत. या संस्थानाचे कुडाळ व वाडी व बांदें असे तीन पेटे आहेत. यांत एकदर सात किल्ले आहेत. त्यांचे वर्णन येणेप्रमाणे: आवर किल्लाः—हा किल्ला सावंतवाडीच्या ईशान्येस सुमारे तेरा मैलांवर व वाडीहून वेंगुर्ल्यास जो रस्ता जातो त्याच्या उत्तरस तनिशे याडौंवर बांधलेला आहे. हा भुईकोट असून त्याचे बांधकाम चिखलांत दगड बसवून केलेले आहे. इ० स०१८४३ त या किल्लयाच्या सभोवार एक कोरडा खदक होता व त्यांत कांठेरी झाडेझुडपें व बांबूची दाट बेटे होती. किल्ल्याच्या उत्तरेस तटाच्या बाहेरच्या बाजूस एक बुरूज बांधलेला होता, व मुख्य किल्ला व हा बुरूज यांच्यामध्ये रस्ता केलेला होता. या रस्त्याच्या एका बाजूस वेळूची अतिशय दाट बेटें होती, व दुसऱ्या बाजूस तट बांधलेला होता. किल्लयाचा दरवाजा