पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२ दिंडू- हे खेडे उंबरगांवच्या उत्तरेस १३ मैलांवर आहे. येथे एक पडापड झालेला लहानसा किल्ला आहे. तो बहुधा पोर्तुगीज लोकांनी बांधला असावा. झेंडावेस्टामध्ये याचे संबंधाने असे लिहिले आहे की, " चांचे लोकांपासून तिकडील समुद्रकिनाऱ्याचे रक्षण करण्याचे काम जड पडूं नये म्हणून इ० स० १७५७त मराठ्यांनी या किल्ल्याची नीट दुरुस्ती केली होती." याशिवाय या किल्लयाचे संबंधानें कांहींच माहिती मिळत नाही. ३३४ संजान व उंबरगांव-उंबरगांव येथे हे दोन कोट आहेत, परंतु त्यांची हल्ली पडापड झालेली आहे, व तेथे महत्त्वाची अशी कोणतीच गोष्ट घडून आल्याचे कळत नाही. हे दोन्ही कोट पोर्तुगीज लोकांनी बांधले असावे असें अनुमान होते, व ते बहुधा चांचे लोकांपासून मुलुखास उपद्रव होऊ नये म्हणून बांधले असावे. अंतःप्रदेशांतील ४ किल्ले. ५ बल्लाळगड. हा किल्ला उंबरगांवच्या पूर्वेस १० मैलांवर २०० फूट उंचीच्या एका टेकडीवर बांधलेला आहे. याच्या सभोवार दाट जंगल आहे. त्याचे क्षेत्रफळ अवघे ८० फुटांजवळजवळ आहे. त्याचा दरवाजा पडून गेला आहे. किल्ल्याचा तट सुमारे १५ फूट उंच व ७ फूट रुंद आहे. किल्ल्यांत एक शाकारलेले घर असून एक पाण्याचे टांके आहे. परंतु त्याचे पाणी अतिशय खराब झालेले आहे. या किल्ल्याची हल्ली पडापड झालेली आहे. ६ गंभीरगड. हा किल्ला डहाणूच्या पूर्वेस २२ मैलां