पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/138

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ल्याच्या पश्चिमेकडील भागांत हल्ली माडाची पुष्कळ झाडे असून तेथे वस्तीही बरीच आहे. किल्ल्याच्या बाहेरच्या तटाला बुरूज आहेत. त्याला आंतून गोळ्या मारतां याव्या म्हणून भोंके ठेविलेली आहेत. त्याची उंची सुमारे १७ फूट आहे. तटाच्या दरवाज्यातून बालेकिल्ल्यावर जाण्याकरितां पाखाडी किंवा बांधीव रस्ता केलेला आहे. बालेकिल्ल्यावर जातांना मध्यंतरी दुसरा एक तट व दरवाजा लागतो. या दरवाज्यांतून आंत गेलें ह्मणजे पुनः पायऱ्या लागतात व त्या चढून वर गेले ह्मणजे तिस-या किंवा बालेकिल्ल्याच्या दरवाज्यांत मनुष्य येऊन पोहोचतें.बालेकिल्ल्याच्या तटाची उंची सुमारे २५ फूट आहे; व तटाच्या सभोवार आग्नेयीकडील कोपरा शिवाय करून खंदक आहे. हा खंदक कोरडा असून त्याची रुंदी सुमारे २४ फूट व खोली अजमासे १३फूट आहे. बालेकिल्ल्याच्या तटाचा माथा सुमारे १२ फूट रुंद असून त्याला अर्धवर्तुलाकृति बुरूज आहेत. बालेकिल्ल्याचा घेर सुमारे 3 मैल आहे. बालेकिल्ल्यांतील वाडा दोन चौकी असून त्याच्या दोन कोपन्यांवर दोन बुरूज आहेत. हा वाडा पाडून त्याचे सामान नाहींसें झाले आहे. किल्ल्याच्या भिंती अद्यापि मजबूत असून त्यांतील इमारतीपैकी काही अद्यापि वसति करण्यसारख्या आहेत. काही वर्षांपूर्वी बेळगांव येथील लष्करी लोकांस चांगल्या हवेवर ह्मणून वारंवार या किल्ल्यांत आणून ठेवीत असत. हल्ली किल्ल्यांत पोलीस लोकांचे ठाणे आहे.