पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/137

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

झाली तोडून टाकिला उठवून नि.स. १८१२त लशांच आपल्या हाती येत नाही, अशी त्या सैन्याची निराशा झाली, तेव्हां त्याने किल्लयाच्या आसपासची हजारों माडाची झाडे तोडून टाकिली व अशा रीतीने विनाकारण नुकसान करून ते लोक वेढा उठवून निघून गेले. पुढे इ. स. १८१९ त पूर्वी फोंड सावंताशी इ. स. १८१२त करार झाला होता त्याप्रमाणे ते। किल्ला घेण्याकरितां इंग्लिशांचे सैन्य रेडी येथे आले. त्या वेळी तो किल्ला संभाजी सांवताचे ताब्यात होता. पूर्वीचा करार असा होता की, सावंतवाडी येथील लोकांनी यापुढे समुद्रावर चांचेपणा केल्यास फोड सावंत याने कंपनीस नुकसानीबद्दल रेडी व निवती हे दोन किल्ले द्यावे. संभाजी किल्ला देईना तेव्हां इंग्लिशांनी किल्लयावर आपला तोफखाना सुरू केला व एका दिवसांत तो किल्ला सर केला. हा किल्ला खाडीच्या मुखाशी दक्षिणेच्या बाजूस बांधलेला आहे. ह्या किल्ल्याला बालेकिल्ला असून तो एका टेंकडीवर बांधलेला आहे. या टेकडीच्या पायथ्याशी सभोंवार सपाट भैदान असून त्याच्या वाटोळा किल्लयाचा मुख्य तट घातलेला आहे. किल्ल्याच्या पूर्व व दक्षिण या बाजूंस खाडीचे पाणी आहे. पूर्वी किल्ल्याच्या आमेयी कोपऱ्यास मोठी दलदल असावी असे वाटते. कारण या बाजूकडची तटबंदी इतर बाजूंकडील तटबंदीच्या मानाने कच्ची दिसते. किल्ल्याच्या नैर्ऋत्य दिशेकडची तटबंदी विशेष उंच नसून त्या बाजूस एक दरवाजा आहे. या दरवाज्यापासून समुद्रापर्यंत मजबूत तट घातलेला असून त्याला मधून मधून बुरूज आहेत. किल्ल्याच्या सभोवतालच्या तटबंदीचा एकंदर घेर सुमारे दीड मैल आहे. कि