पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/136

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१२८) झालेल्या होत्या. तसेंच आंत शिबंदी नसून पाण्याचा पुरवठाही मुळीच नव्हता. आंत जुन्या व निरुपयोगी अशा २६ तोफा व तोफांचे १०६ गोळे पडलेले होते. हा किल्ला कपतान पियरसन याने तारीख ६ एप्रील १८१८ रोजी मराठयांपासून घेतला. शिवा वेंगर्ले तालका भिE -:: ४० किल्ला रेडी किंवा यशवंतगड हा किल्ला. फार मजबूत असून मुसलमानांच्या सत्तेचा हास होण्यास ज्या वेळी प्रारंभ झाला त्या वेळी बांधला (इ. स. १६६० ). इ. स. १६६२ त शिवाजीनें मालवण येथील प्रसिद्ध सिंधुदुर्ग किल्ला बांधला त्याच सुमारास हा किल्ला बांधला असें डफसाहेबांच्या इतिहासांत लिहिलेले आहे. परंतु त्या प्रांतावर विजापुरसरकारचा अमल असतां तेथें मुळचा एक लहानसा किल्ला होता व तो वाडीच्या सावतांच्या ताब्यांत होता. पुढे शिवाजीने तो मुलूख काबीज केल्यावर त्या किल्लयाची फार उत्तम रीतीने दुरुस्ती केली. इ. स. १८१७ त हा किल्ला सावंतांच्या ताब्यात होता त्या वेळी गोव्यांहून सैन्य येऊन त्याने या किल्ल्यास वेढा दिला, व किल्ल्याच्या शेजारी हस्त नांवाचा डोंगर आहे, तेथून किल्ल्यावर तोफांचा मारा चालविला.परंतु त्यापासून किल्ल्याचें कांहींच नुकसान झाले नाही. तोफांचे गोळे लागून पडलेल्या त्या वेळच्या खुणा बालेकिल्लयाच्या दक्षिणेकडील भिंतीवर अद्यापि दृष्टीस पडतात. तोफ लावून किल्ला