पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/133

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आपण यापुढे तसे करणार नाही अशाबद्दल त्याने हमी द्यावी; ३ मुंबई सरकारास नुकसानीबद्दल ३८२८९० रुपये द्यावे; ४ इंग्लिशांस मालवण येथें वखार घालण्यास परवानगी द्यावी; व ५ इंग्लिशांनी सिंधुदुर्ग किल्ला त्यास परत द्यावा. तरी एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभापर्यंत मालवण येथील मराठे लोक अतिशय उपद्रव देत होते, पुढे इ० स० १८१२ त कर्नल लायोनल स्मिथ साहेब बरोबर आरमार घेऊन मालवण येथे गेला व त्याने सिंधुदुर्ग किल्ला घेऊन तेथील चांचे लोकांचा बीमोड करून टाकिला. सिंधुदुर्गापासून थोड्याशा अंतरावर दुसरा एक किल्ला एका लहानशा बेटावर बांधलेला आहे, व त्याला पद्मगड असें ह्मणतात, हे मागे सांगितलेच आहे. त्याचे क्षेत्रफळ सुमारे एक एकर आहे. तेथे शिवाजी आ. पली गलबलें बांधीत असे असे सांगतात. इ. स. १८६२ त या किल्लयाची बहुतेक पडापड झालेली होती. शिवाजीने सिंधुदुर्ग बांधिला त्याच वेळी किनाऱ्यावरही त्याने दोन किल्ले बांधले. त्यांपैकी एकाला राजकोट व दुसऱ्याला सर्जेकोट असे म्हणतात. हेही मार्ग आलेच आहे. राजकोट मालवण शहराच्या हद्दीत असून त्याच्या तीन बाजूंस समुद्र आहे. या कोटाच्या भिंती विशेष मजबूत नाहीत. त्याच्या तीन कोपयांस तीन बुरूज आहेत. त्यांची हल्ली पडापड झालेली आहे. या कोटाजवळ हल्ली काही इमारती आहेत, त्यांपैकी बराकी इ. स. १८१२ त बांधल्या, तसेच आंत मामलतदाराची कचेरी आहे, व इ० स० १७९२ त इंग्लिशांनी