पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/134

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जेथे आपली वखार बांधिली होती, त्या जागेला हल्ली ओल्ड रेसिडेन्सी असे म्हणतात. इ० स० १८६२ त राजकोटाची बहुतेक भिंत पडलेली होती व आंत एक जुनी निरुपयोगी तोफ होती. सर्जेकोटः-हा किल्ला राजकोटाच्या उत्तरेस सुमारे पावणे दोन मैलांवर आहे. तो रंडी नांवाचें समुद्रकाठी एक खडे आहे त्यांत मोडतो. त्याच्या उत्तरेस समुद्र असून बाकीच्या तीन बाजूंस खंदक आहे- इ. ड. १८६२ त तटाची पडापड सुरू झालेली होती व आंत पाण्याची वगैरे कांहीं सोय नव्हती. - ३७ नांदोसचा किल्ला:-हा किल्ला मालवण तालुक्यांत नांदोस नांवाच्या खेड्यांत मोडतो. त्याचे क्षेत्र: फळ सुमारे पाच एकर आहे.. इ. स. १८६२ त हा किल्ला फार चांगल्या स्थितीत होता. या किल्लयाच्या सभोवार खंदक आहे. आंत शिबंदी ववैरे काही नाही. या किल्लयास धान्य, पाणी वगैरेचा पुरवठा चांगला आहे. 1३८ निवतीचा किल्ला:-हा किल्ला मालवणच्या दक्षिणेस साडेसहा मैलांवर व वेंगुल्याच्या उत्तरेस सुमारे९ मैलांवर कोचरें या नांवाच्या खेड्यांत मोडतो. तो एका लहानशा खाडीच्या मुखाशी बांधलेला आहे. ज्या टेकडीवर हा किल्ला बांधलेला आहे तिची उंची सुमारे १५० फूट असून तिच्यावर पुष्कळ झाडी आहे. हा मूळ वाडीच्या सावंतांच्या ताब्यांत होता. इ. स. १७८६ त कोल्हापुरच्या राजाच्या सैन्याने तो सावंतांपासून घेतला; परंतु पुढे कोल्हापुरच्या राजाने तो किल्ला सावंतांस परत दिला. इ. स. १८०३ पासून इ. स. १८१० पर्यंत या किल्ल्याचे