पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/132

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१२४) झाल्या. त्यावेळी मालवणचा किल्ला कोल्हापूर सरकारचे तान्यांत गेला, व तेव्हांपासून मालवण हे चांचे लोकांचें एक मुख्य ठाणे झाले. तेथील लोक समुद्रात फारच त्रास देत असत.इ० स० १७१० त हामिलटन नांवाच्या साहेबाने असें वर्णन केले आहे की,“ मालवण येथे चांचे लोकांचा एक स्वतंत्र सरदार असून त्याचे जवळ तीन चार गलबतें आहेत, व जो त्याच्या सपाट्यांत येतो त्याला तो बुचाडल्याशिवाय सोडीतच नाही." इ० स०१७१५ त या चांचे लोकांनी इंग्लिशांच्या दोन गलबतांवर झडप घातली. त्यांपैकी एकावर त्या वेळेचा इंग्लिशांचा मुंबईचा डेपुटी गव्हरनर स्टूट साहेब होता. परंतु इंग्लिशानी त्या लोकांवर आपली तोफ सुरू केल्यामुळे ते लोक पळून गेले. इ०स०१७३०त त्या लोकांनी इंग्लिशांचें एक जहाज फुटले होते तें धरून नेले. या संबंधाने मालवणच्या कोल्हापूर- . करांचा सरदार शंकरपंत व इंग्लिश यांच्यामध्ये बराच वादविवाद होऊन शेवटी उभयपक्षी तह ठरला. इ० स० १७६५ त इंग्लिशांचे सरदार मेजर गॉर्डन व कपतान जान वाटसन हे आरमार घेऊन सिंधुदुर्गावर चाल करून गेले. पुढे लौकरच तो किल्ला त्यांचे हाती आला, व त्यांनी त्याचे नांव फोर्ट आगष्टस असें ठेविलें. इंग्लिशांचे मनांत तो किल्ला आपणांकडे रहावा असे होते. परंतु तो किल्ला आपणांकडे ठेवण्यापासून विशेष फायदा नाही, व तो जमीनदोस्तही करता यावयाचा नाही, असे पाहून त्यांनी तो कोल्हापूरकरांस परत दिला. त्या वेळी त्या उभयतांत जो तह झाला त्यांतील कलमें येणेंप्रमाणेः-१ कोल्हापुरच्या राजाने समुद्रांत व्यापारी गलबतांस त्रास देऊ नये; २