पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/131

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१२३) त्यांवर लहानलहान घुमट बांधलेले आहेत. हल्ली किल्ल्यांत गाबीत लोकांच्या कांहीं झोपड्या आहेत. ह्या लोकांनी किल्ल्यांत जी माडाची झाडे आहेत त्यांचा मक्ता सरकाराकडून ठरवून घेतलेला आहे. देवालयाला लागूनच एक गोरख चिंचेचा वृक्ष आहे. या देवालयाला कोल्हापुरच्या महाराजांनी इ. स. १८१२ त त्यांचा दिवाण रत्नाकर आपा याच्या सूचनेवरून सालीना १५२२ रुपयांची नेमणूक करून दिलेली आहे. शिवाजी महाराजांचा पूजेचा मुख्य दिवस आदित्यवार आहे. मी जिन्याचा किल्ला घेण्याकरितां शिवाजी शिद्दीबरोबर बरेच दिवस झगडत होता. परंतु त्या कामी त्याला फारसे यश आले नाही. पुढे इ. स. १६६५त समुद्रकिनाऱ्यावर कोठे तरी आपलें मुख्य ठाणे असले पाहिजे, असा विचार . त्याचे मनांत येऊन, मालवणचें बंदर त्याचे मनांत भरलें, व त्याने बाहेरच्या किंवा मोठ्या बेटावर मजबूत किल्ला बांधून त्याचे नांव सिंधदुर्ग असें ठेविलें. हा किल्ला बांधीत असतां शिवाजीने स्वतः आंगमेहनतीने पुष्कळ काम केले आहे असे सांगतात. सिंधुदुर्गाचे काम पुरें झाल्यावर त्याच्या काहीसें आंतल्या बाजूस दुसरें एक लहानसें बेट होते त्यावर त्यांने दुसरा एक किल्ला बांधून त्याचे नांव पद्मगड असें ठेविलें. समुद्राच्या बाजूने अशा रीतीने पक्का बंदोबस्त केल्यावर जमीनीच्या वाजूने खाडीच्या मुखाशी त्याने आणखी दोन किल्ले बांधले. त्यांपैकी एकाला राजकोट व दुसऱ्याला सर्जेकोट असें ह्मण तात. इ० स० १७१३ त शिवाजी महाराजांच्या राज्याच्या सातारा व कोल्हापूर अशा दोन शाखा