पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/130

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१२२) बाजूंकडील तटबंदी दुरुस्त होती. या तटबंदीवर लहान लहान उंबराची झाडे वाढलेली होती. परंतु त्यांचा मुख्य तटाला धक्का पोहोंचला नव्हता. दक्षिण व पश्चिम या बाजूंकडील तटबंदीची स्थिति मात्र फार भयंकर झाली होती. ह्या दोन्ही तटांवरील पडभिंत किंवा सफेली पावसाच्या योगाने झिरपून जाऊन बहुतेक नाहीशी झालेली होती. किल्ल्यांतील इमारतींची जरी दुरुस्ती होत होती तरी दारूखाना व मुख्य दरवाजा हे दोन भाग शिवाय करून बाकीच्या इमारती डोके खाली टेंकण्याच्या बेतांत आलेल्या होत्या. परंतु पुढे दरवर्षी आंतील इमारतींची दागदुजी काळजीने होत गेल्यामुळे इ० स० १८६२ पर्यंत आंतील बहुतेक भाग बऱ्याच चांगल्या स्थितीत होता. त्या वेळी आंत पहारा वगैरे काही नव्हते. फक्त १९ निरुपयोगी तोफा पडलेल्या होत्या. - या किल्ल्याचे क्षेत्रफळ सुमारे ४८ एकर आहे. पूर्वीच्या इमारतींपैकी काही देवालये शिवायकरून बाकी सर्व इमारती हल्ली जमीनदोस्त झाल्या आहेत असे म्हटले तरी चालेल. शिवाजीने समुद्र किनाऱ्यावर जे किल्ले बांधले, त्या सर्वांत हा सिंधुदुर्ग किल्ला प्रमुख आहे, असें ह्मणण्यास हरकत नाही. आंत शिवाजी महाराजाचे एक देवालय आहे. ह्या देवालयांत महाराजांच्या मूर्तीची स्थापना केली असून सणवारी तिला रुप्याचा किंवा सोन्याचा मुखवटा घालतात. देवालयाच्या एका भिंतीच्या दगडावर शिवाजी महाराजांच्या हातांची व पायांची चिन्हें काढलेली आहेत, व माहात्या.