पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/129

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

म्हणजे तेथचा जंजिरा किल्ला होय. त्याला सिंधुदुर्ग असे म्हणतात. समुद्रकिना-यावरील एकंदर किल्लयांचा तो राजा आहे असे मटले तरी चालेल. सुवर्णदुर्ग किल्ला ज्याप्रमाणे बाहेरून अतिशय भव्य दिसतो त्याप्रमाणे हा किल्ला दिसत नाही. तथापि त्याच्यापेक्षा ह्या किल्लयाचा घेर फार मोठा म्हणजे जवळजवळ दोन मैल आहे. हा किल्ला एका बेटावर बांधलेला असून ते बेट किनाऱ्यापासून सुमारे एक मैलावर आहे. ह्या बेटाचा आकार उंचसखल व वांकडातिकडा असल्यामुळे किल्ल्याचे बांधकामही तसेच करावे लागले. पुष्कळ ठिकाणी त्याची टोंके बाहेर आलेली आहेत. या गोष्टीमुळे ज्याचे हाती किल्ला असेल त्याला एक असा मोठा फायदा आहे की, शत्रु एखाद्या टोकाशी आल्यास त्याच्यावर दुस-या एखाद्या टोकावरून फार चांगला मारा करितां येतो. किल्लयाच्या तटाची उंची २९ पासून ३० फुटांपर्यंत आहे. परंतु आंतील जागा सखल असल्यामुळे काही ठिकाणची तटबंदी फारच सखल दिसते. विशेषतः समुद्राच्या बाजूने ही तटबंदी फारच सखल दिसते; म्हणजे ती समुद्राच्या जवळजवळ समपातळीत आहे असे म्हटले तरी चालेल. किल्लयाच्या तटाची रुंदी १२ फुटांवर आहे. या तटाला एकंदर ४२ बुरूज आहेत व एका बुरुजापासून दुसऱ्या बुरुजापर्यंत ४० याडर्डीपासून १३० यार्डीपर्यंत अंतर आहे. या बुरुजांचा आकार अर्धवर्तुलाकृति असून त्यांना तोफा मारण्याकरितां भोंके ठेविलेली आहेत. पुष्कळ ठिकाणी पायथ्यापासून तटाच्या माथ्यावर जाण्याकरिता दगडी जिने केलेले आहेत. किल्ल्याचा दरवाजा ईशान्य कोपन्यास आहे. इ० स० १८२८ त उत्तर व पूर्व या ११