पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/128

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१२०) त्यांच्या तोफांचा काही उपयोग होईना. नंतर शिड्या लावून किल्ल्यावर हल्ला करावा अशा हेतूनें इम्लाक साहेबाने आपल्या फौजेच्या दोन टोळ्या केल्या व त्यांवर क्यापटन ग्रे व पियरसन या दोन साहेबांस मेमून त्या पाठवून दिल्या. नंतर ते लोक नदी उतरून अलीकडे आले. किल्लयावरील शिबंदीने इंग्लिशांची फौज नदी उतरून अलीकडे येत आहे असे पाहतांच ते किल्ला सोडून निघून गेले, व ता० ३० मार्च रोजी तो इंग्लिशांचे हाती आला. Detail P३३ वेताळगड. हा किल्ला मालवण तालुक्यांत वराड -पट्यांत पेंडूर नांवाच्या खेड्यांत एका टेकडीवर बांधलेला आहे. या किल्ल्याचे एकंदर क्षेत्रफळ सुमारे २२ . एकर आहे. इ. स. १८६२ साली या किल्लयाची पहाणी झाली त्या वेळी आंत शिबंदी वगैरे काही नसून त्याचा तट अगदी मोडकळीस आलेला होता. किल्ल्यांत धान्य व पाणी यांचा पुरवठा चांगला आहे. या ठिकाणी विशेष ऐतिहासिक महत्त्वाची गोष्ट घडून आलेली दिसत नाही. ३४ सिधगड. हा किल्ला मालवण तालुक्यांत माल. वणच्या ईशान्येस १६ मैलांवर एका डोंगरावर बांधलेला आहे. त्याचे क्षेत्रफळ सुमारे अडीच एकर आहे. इ० स० १८१८ त कर्नल इम्लाक साहेबास प्रथमतः किल्लयांतील शिबंदीने दाद दिली नाही. परंतु पुढे त्याने जास्त मदत बोलावून तो किल्ला घेतला. हल्ली हा किल्ला मोडकळीस आलेला आहे. ३५ मालवणचा किल्ला किंवा सिंधुदुर्ग.-मालवण येथे गेल्यावर तेथे पहाण्यासारखी मुख्य गोष्ट मटली