पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/127

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(६११९) १६७० त शिवाजीने त्याची पाहणी केली, परंतु तेथे पाण्याची कांहींच सोय न दिसल्यामुळे त्याने तो बेत रहित केला. पुढे इ० स० १६८० च्या सुमारास वाडीकर फोंड सावंत व कोल्हापुरचे पंतप्रतिनिधि ( बावडेकर) यांचेमध्ये तंटा लागला. तेव्हां संकटसमयीं आपल्या रक्षणाकरतां ह्मणून या डोंगरावर किल्ला बांधावा असें फोंड सावंत याचे मनांत आले. नंतर त्याने प्रथमतः तेथे विहीर पाडण्यास आरंभ केला, व तिला पाणी लागले तेव्हां त्याने तेथे किल्ला बांधला(इ० स० १७०१).इ० स० १८६२ त या किल्ल्याचे तट वगैरे नीट दुरस्त होते, व आंत निरुपयोगी अशा १८ तोफा पडलेल्या होत्या. सावंतांचे ताब्यात असतां येथे बऱ्याच झटापटी झालेल्या आहेत. . ३२ भगवंतगड हा किल्ला मालवण तालुक्यांत एका उंच डोंगरावर बांधलेला आहे. याचे क्षेत्रफळ सुमारे १॥ एकर आहे. आंत पाण्याचा पुरवठा नाही, व निरुपयोगी अशा १४ तोफा पडलेल्या आहेत. आंत एक लहानसें देवालय आहे. फोंड सावंत यानें इ० स० १७०१ त भरतगड बांधला त्याच सुमारास त्याचे प्रतिस्पर्धि बावडेकर यांनी हा किल्ला बांधला. इ० स० १८१८ त कर्नल इम्लाक याने मराठ्यांपासून हा किल्ला घेतला. या संबंधाची हकीगत अशी आहे की, " इम्लाक साहेब आपल्या फौजेनिशी तारीख २९ मार्च रोजी येथे येऊन पोहोंचला व रात्रीच्या रात्रीस मेढेकोट तयार करून सकाळच्या प्रहरी त्याने किल्लयावर तोफांचा मारा चालविला. इंग्लिशांची फौज कालावली नदीच्या पलीकडे असल्यामुळे