पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/126

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रघात पडलेला आहे. हा किल्ला भुईकोट आहे, व त्याचे क्षेत्रफळ २ एकर आहे. या किल्ल्याला पूर्वी खंदक होता. हल्ली तो भरून गेलेला आहे, व तेथे हल्ली लागवड करितात. इ० स० १८६२ त या किल्ल्याची सर्वत्र पडापड झालेली होती, व भगवतीच्या देवालयाजवळ जुन्या निरुपयोगी अशा चार तोफा पडलेल्या होत्या. मालवण तालुका ३१ भरतगड. हा किल्ला मालवण तालुक्यांत मसुरें नांवाच्या गांवा शेजारी एका उंच डोंगरावर बांधलेला आहे. ह्याचे क्षेत्रफळ सुमारे ५।६ एकर आहे. आंत बालेकिल्ला आहे त्याचा आकार लांबोळा आहे. त्याची लांबी १५० यार्ड व रुंदी १० यार्ड आहे, व त्याचा तट सुमारे १८ फूट लांब व ५ फूट रुंद आहे. तसेच उत्तरेच्या व दक्षिणेच्या टोकांस दोन बुरूज आहेत. याशिवाय मध्यंतरी एक बुरुज असून त्याला वर जाण्यास पायऱ्या वांधलेल्या आहेत. उत्तरेकडील तटाजवळ एक लहानसें देवालय असून त्याच्याजवळ एक विहीर आहे. ही विहीर २२८ फूट खोल आहे. किल्ल्याच्या मुख्य तटाला अर्धचंद्राकृति असे सुमारें १० बुरूज आहेत. ह्या तटाची उंची सुमारे १२ फुट आहे, व त्याच्या बाहेर खंदक आहे. हा तट विशेष मजबूत नाही. ह्या डोंगरावर किल्ला बांधावा अशा हेतूनें इ० स०