पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/125

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेळी फार प्रसिद्ध होता. इ. स. १८१८ पासून इ. स. १८७५ पर्यंत तेथे देवगड तालुक्याचे मुख्य ठाणे होते. त्या गांवाला लागूनच एक लहान डोंगर आहे,त्यावर एक किल्ला बांधलेला आहे, त्याला खारेपाटणचा किल्ला असें ह्मणतात. इ.स.१८९० त या किल्लयाचा तट व बुरूज पाडून ते दगड वाघोटण येथें उतारू लोक उतरण्याकरितां खाडीवर धक्का बांधण्याकरितां नेले. किल्ल्यांत अद्यापि बारा तेरा मशिदीच्या खाणाखुणा दृष्टीस पडतात. जाम नांवाची ह्मणून जी एक मशीद दाखवितात तिचे क्षेत्रफळ फारच मोठे आहे. मुसलमानांचे ताब्यांत हा किल्ला बरेच दिवस असावा असे दिसते. सतराव्या शतकाच्या अखेरीस तो कान्होजी आंग्रे याने मुसलमानांपासून घेतला. इ. स. १७१३त बाळाजी विश्वनाथ याच्या मध्यस्थीने शाहूमहाराज व कान्होजी आंग्रे यांच्यामध्ये सलोखा होऊन महाराजांनी त्याला जे १६ सवघड किल्ले दिले, त्यांत खारेपाटणचा किल्ला हा एक होता. इ. स. १७६६ पर्यंत त्याचे स्वामित्व आंग्र्यांकडे होते. पुढे पेशवे व आंग्रे यांच्यांत बेबनाव होऊन इंग्लिश व पेशवे मिळून त्यांनी आंग्र्यांची बरीच ठाणी घेतली; त्या वेळी खारेपाटणचा किल्ला पेशव्यांनी घेतला. तो इ. स. १८१८ पर्यंत पेश. व्यांचे ताब्यात होता. पुढे त्याचे स्वामित्व इंग्लिशांकडे आले. पूर्वी तेथे किल्ला होता किंवा नव्हता याचीच हल्ली प्रांति पडू लागली आहे. ३० कोटकामतेः--कामते हा गांव देवगड तालुक्यांत आहे. येथे पूर्वी एक लहान किल्ला किंवा कोट होता. त्यावरून हल्ली त्या गांवाला कोटकामतें अखें झणण्याचा