पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२ मैलांवर देवगड शहराच्या दक्षिणेच्या अंगास आहे. त्याचे क्षेत्रफळ सुमारे १२० एकर आहे, व . सुमारे १७५ वर्षापूर्वी तो आंग्रचांनी बांधला असावा असे सांगतात. हा किल्ला इंग्लिशांचा सरदार कर्नल इम्लाक याने इ० स० १८१८ च्या एप्रिल महिन्यांत मराठ्यांपासून घेतला. ता. ७ एप्रिल रोजी कर्नल इम्लाक याची टोळी देवगड येथे येऊन पोहोचली. त्या रात्रीस किल्लयांतील लोकांनी इंग्लिशांवर मोठ्या जोराने मारा चालविला होता. परंतु त्यापासून इंग्लिशांचे मुळीच नुकसान झाले नाही. दुसरे दिवशी सकाळी किल्लयांतील लोक किल्ला सोडून गलबतांत बसून पळून गेले... क. ह्या किल्लयावरून देवगडच्या बंदरावर चांगला मारा लागू पडतो. देवगडच्या खाडीवर एखादे विशेष महत्त्वाचे ठिकाण नसल्यामुळे पूर्वीपासून या किल्ल्याला फारसें महत्त्व नव्हते. समुद्र व बंदर यांचे दरम्यान् जो डोंगर आहे, त्याच्या उत्तर व दक्षिण या टोकांस पूर्वी दोन किल्ले असून त्यांच्यामध्ये एक तट होता व त्याला चार बुरूज होते... हल्ली या किल्ल्यांचा मागमूस राहिला नाही. इ० स० १८६२ त देवगड किल्लयाची फार पडापड झालेली होती व आंत शिबंदी वगैरे कांही एक नव्हते. आंत पाणी विपुल होते, परंतु धान्याचा फारसा पुरवठा नव्हता. तसेंच आंत ४१ जुन्या निरुपयोगी तोफा पडलेल्या होत्या. २९ खारेपाटणचा किल्ला.-खारेपाटण हा गांव विज. • यदुर्गच्या खाडीच्या उत्तर तीरावर आहे.हा गांव मराठ्यांचे