पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/123

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आनंदराव धुलप यास तेथे ठेविलें. विजयदुर्ग येथे आनंदरावाचे वंशज अद्यापि आहेत. धुलपांनीही समुद्रांत पुढे इंग्लिशांना फार त्रास दिला. आनंदरावाने इ० स० १७८० त इंग्लिशांचे एक गलबत पकडले. व त्यावरील अमलदारास कैद करून महाबळेश्वराजवळच रसाळगडावर पाठवून दिले. इ० स० १७८२ त त्याने दुसरें एक इंग्लिशांचे जहाज धरिलें. इ० स० १८०० त लेफटेनेंट हेयीस यास मराठ्यांच्या आरमाराचा नाश . करण्याकरितां इंग्लिशांनी पाठवून दिले. त्या साहेबानें पुष्कळ ठिकाणी मराठ्यांच्या आरमाराचा नाश केला. परंतु थोड्याच वेळांत मराठे पुनः बळावले, व पूर्वीप्रमाणे चांचे• पणा करून त्यांनी इंग्लिशांस त्राहि त्राहि करून सोडिलें. इ.स.१८१८ त कर्नल इम्लाक साहेब विजयदुर्ग घेण्याकरिता गेला. त्या वेळी धुलपाने त्याच्यावर तोफांचा असा भडिमार चालविला की, त्याला आपल्या गलबतांचे दोर कापून पळून जावे लागले. परंतु त्या वेळी किल्लयाच्या सभोवतालचा सर्व प्रदेश इंग्लिशाचे ताब्यात आला होता त्यामुळे नाइलाज होऊन त्या वर्षाच्या जून महिन्यांत धुलपांनी तो किल्ला इंग्लिशांचे स्वाधीन केला. मा २७ बहिरवगड. हा किल्ला सह्याद्रीच्या एका शिखरावर बांधलेला असून तो देवगड तालुक्यांत दिगवलें नांवाच्या खेड्यांत मोडतो. त्याचे क्षेत्रफळ चार पासून पांच एकरांपर्यंत आहे. इ० स० १८६२ त त्याची पहाणी झाली तेव्हां पूर्वी तेथे किल्ला होता किंवा नव्हता याची खण सुद्धा उरली नव्हती. TESTIMVETTE २८ देवगड. हा किल्ला विजयदुर्गाच्या दक्षिणेस